'गेले पाच वर्ष मी त्याच्यासोबत बोलली नाही...' सलमान खान याच्या एक्स गर्लफ्रेन्डचा मोठा खुलासा

बॉलिवूडचा दबंग खान अर्थातचं अभिनेता सलमान खान कायम  चर्चेत असतो. 

Updated: Jul 20, 2021, 10:10 AM IST
'गेले पाच वर्ष मी त्याच्यासोबत बोलली नाही...' सलमान खान याच्या एक्स गर्लफ्रेन्डचा मोठा खुलासा title=

मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान अर्थातचं अभिनेता सलमान खान कायम  चर्चेत असतो. सलमान फक्त त्याच्या चित्रपटामुळेचं नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतो. सलमानचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. पण सर्वात जास्त  चर्चा रंगली ती म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत असलेल्या नात्यामुळे. पण त्याआधी  सलमान, अभिनेत्री सोमी अलीसोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आला. आता सध्या सलमानबद्दल सोमीने केलेला खुलासा चर्चेत आला आहे. 

ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सोमीने खासगी आयुष्य आणि करियरबद्दल अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.  सोमीला बॉलिवूडसोडून 21 वर्ष पूर्ण झाली आहेत. वयाच्या 16 व्या वर्षी 'मैने प्यार किया' चित्रपटामधील प्रेमने तिच्या मनात घर केलं. सोमी म्हणाली, 'मला अभिनयात रस नव्हता. मी कायम माझे डान्स रिहर्सल मिस करायची. सरोज कायम माझ्यावर रागवायच्या..'

सलमान खान से ब्रेकअप के बाद इस एक्ट्रेस ने लिया था जिंदगी बदलने वाला फैसला, देखिए अब क्या करती हैं काम

पुढे सोमी म्हणाली, 'सरोज म्हणायच्या तु पुन्हा क्लास मिस केलास. पण मला टॉप स्टार्स संजय दत्त, सुनील शेट्टी, सैफ अली खान, सलमान खान आणि  मिथुन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.' यावेळी सोमीने सलमानसोबत असलेल्या नात्याबद्दल वक्तव्य केलं. 

'गेल्या पाच वर्षांपासून सलमानसोबत बोलत नाही. तो त्याच्या आयुष्यात फार पुढे गेला आहे. मी देखील माझ्या आयुष्यात आनंदी आहे.' शिवाय 1999 नंतर सलमानच्या आयुष्यात किती मुलींची एन्ट्री झाली हे देखील सोमीला माहिती नाही.