धक्कादायक... आणखी एका स्टारच निधन, मॉलमध्ये आढळला मृतदेह

मॉलमध्ये आढळला प्रसिद्ध स्टारचा मृतदेह, मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट  

Updated: Jun 12, 2022, 09:40 AM IST
धक्कादायक... आणखी एका स्टारच निधन, मॉलमध्ये आढळला मृतदेह  title=

मुंबई : प्रसिद्ध सेलिब्रिटी फॅशन डिझायनर प्रत्युषा गरिमेलाच्या निधनानंतर प्रसिद्ध टिक-टॉक स्टार Cooper Noriega  चं निधन झालं आहे. त्याच्या निधनानंतर सोशल मीडियावर धक्कादायक वातावरण आहे. कूपर नोरिगाने वयाच्या 19 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्याचा मृतदेह अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे एलए नावाच्या मॉलमध्ये आढळला आहे. मृत्यूच्या काही वेळापूर्वी कूपर नोरिगाने सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडीओ देखील शेअर केला होता.

लॉस एंजेलिस काउंटी वैद्यकीय परीक्षक-कोरोनर विभागाच्या मते, नोरिगा कॅलिफोर्निमधील मॉलच्या कार पार्किंगमध्ये संध्याकाळी 4:20 वाजता मृतावस्थेत आढळून आला. मात्र, मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. 

कूपर नोरिगाचं मृतदेह सध्या शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तपासापूर्वी मृत्यूबाबत काहीही सांगणे कठीण असल्याचं सांगण्यात येत आहे. कूपर नोरिगा बद्दल सांगायचं झालं तर इन्स्टाग्रामवर त्याचे 4,27,000 फॉलोव्हर्स आहेत, तर टिकटॉक वर 1.7 M पेक्षा अधिक त्याचे चाहते आहेत.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याआधीही कूपर नोरिगा अनेकदा त्याच्या मानसिक आरोग्याविषयी आणि सोशल मीडियाच्या व्यसनाबद्दल उघडपणे बोलला आहे. 4 जून रोजी, स्टारने इंस्टाग्रामवर सांगितले होते की, यासाठी तो एक 'डिस्कॉर्ड' ग्रुप देखील सुरू करणार आहे जो मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल बोलेल.