स्मृती इराणी यांच्या मुलीचा साखरपुडा, जावयाला दिली अशी धमकी

होणाऱ्या जावयाचा फोटो शेअर करत म्हणाल्या...  

Updated: Dec 26, 2021, 09:36 AM IST
स्मृती इराणी यांच्या मुलीचा साखरपुडा, जावयाला दिली अशी धमकी title=

मुंबई : केंद्रीय मंत्री आणि अभिनेत्री स्मृती इराणी या सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. वेग-वेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. त्या त्यांच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. स्मृती यांना दोन मुलं आहे. त्यांच्या दोन मुलाचं नाव जोर इराणी, तर मुलीचं नाव जोइश इराणी असं आहे. दुसरीकडे त्यांच्या पहिल्या पत्नीच्या मुलीचं नाव शैनेल असं आहे.

शैनेल आता जीवनाच्या नव्या प्रवासाला सुरूवात करणार आहे. मुलीच्या  नव्या  प्रवासाची एक झलक स्मृती यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. शैनेलचा साखरपुडा झाला आहे. या खास क्षणाचे काही फोटो स्मृती यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Smriti Irani (@smritiiraniofficial)

 फोटो शेअर करत त्यांनी होणाऱ्या जावयाला मजेशीर अंदाजात धमकी देत त्याचं कुटुंबामध्ये स्वागत केलं आहे. फोटोमध्ये शैनेलचा बॉयफ्रेंड होणाऱ्या पत्नीला गुडघ्यांवर बसून अंगठी घालताना दिसत आहे.  सध्या हा खास फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

स्मृती इराणी कॅप्शनमध्ये म्हणाल्या, 'ही खास पोस्ट त्या खास व्यक्तीसाठी ज्याने आमचं मन जिंकलं आहे. आमच्या कुटुंबात तुमचं स्वागत... सासऱ्यांसोबत तुमची भेट मजेदार असणार आहे आणि माझ्याकडूव ऑफिशियल वॉर्निंग...' असं म्हणत स्मृती इराणी यांनी नव्या जोडप्याला आशीर्वाद दिले आहेत.