श्वेता तिवारीच्या मुलीसमोर गायकाची सरकली पॅन्ट, ते क्षण कधीही विसरू शकत नाही पलक!

श्वेता तिवारीची मुलगी कधीही विसरू शकत नाही तो क्षण, व्हिडीओ व्हायरल 

Updated: Feb 14, 2022, 12:31 PM IST
श्वेता तिवारीच्या मुलीसमोर गायकाची सरकली पॅन्ट, ते क्षण कधीही विसरू शकत नाही पलक! title=

मुंबई : सध्या घडीला गायक गाणं देखील म्हणतात आणि म्युझीक व्हिडीओवर डान्स देखील करतात. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील होत असतात. अशाच प्रसिद्ध गायकांपैकी एक म्हणजे हार्डी संधू. हार्डी संधू सध्या घडीचा आघाडीचा गायक आहे. लोक त्याला पसंत देखील करतात. पण हार्डी संधूचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

पंजाबचा प्रसिद्ध गायक हार्डी संधूने लहान मुलांनाच नाही तर वृद्धांनाही गाण्यांमुळे वेड लावलं आहे. हार्डी संधूचे कोणतंही गाणं आले की त्याचे चाहते  गाणं ऐकण्यासाठी उत्सुक असतात. खास म्हणजे मुलींमध्ये हार्डी संधूची वेगळीच क्रेझ आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Harrdy Sandhu (@harrdysandhu)

हार्डी संधूचे कोणतंही गाणं आले की ते चर्चेत येतं. पण सध्या त्याचा एक व्हिडीओ तुफान चर्चेत आहे. व्हिडीओमध्ये हार्डी  'बिजली बिजली' गाण्याचं शुटींग करताना दिसत आहे. 

हार्डी अभिनेत्री पलक तिवारीसोबत गाण्याची शुटिंग करत आहे. शूटिंग सुरू असताना हार्डी संधूची पॅन्ट खाली सरकते. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली. जेव्हा हार्डी संधूला कळलं की त्याची पॅन्ट मुलींसमोर खाली उतरली आहे. 

खुद्द हार्डी संधूने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. पलक तिवारीने बिजली या गाण्याने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. पहिल्या गाण्याच्या शुटिंग दरम्यान आलेला हा अनुभव पलक कधीही विसरू शकणार नाही.