शाल्मली खोलगडेच्या लग्ना इतकीत, तिच्या वरमालेची चर्चा... नक्की काय आहे खास ?

शाल्मलीच्या लग्नासोबत तिच्या वरमालेचीही चर्चा 

Updated: Dec 1, 2021, 03:57 PM IST
शाल्मली खोलगडेच्या लग्ना इतकीत, तिच्या वरमालेची चर्चा... नक्की काय आहे खास ? title=

मुंबई : ‘बलम पिचकारी’ आणि‘लत लग गई’सारखी सुपरहिट गाण्यांना आवाज देणारी गायिका शाल्मली खोलगडे (Shalmali Kholgade) विवाहबंधनात अडकली आहे. शाल्मलीने खूप दिवस डेट करत असलेल्या फरहान शेख (Farhan Sheikh) सोबत लग्न केले आहे. शाल्मलीच्या लग्नासोबतच तिच्या लग्नातील वरमालेचीच चर्चा होती. शाल्मलीने अतिशय हटके स्टाईलची वरमाला घातली होती. 

वरमालेतील खास गोष्ट 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shalmali (@shalmiaow)

हारांची देवाणघेवाण हा हिंदू विवाहातील सर्वात महत्वाचा विधी आहे. शाल्मली आणि फरहान यांच्या वरमालेने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. वरमालेत या दोघांच्या नात्याचा खास भावना जोडल्या आहेत. लग्नाच्या आधी हे जोडपे सहा वर्षांहून अधिक काळ रिलेशनशिपमध्ये होते. या सहा वर्षातील खास क्षण त्यांनीसोबत घेऊन सात फेरे घेतले आहेत. 

शाल्मलीने का निवडली ही खास तारीख 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shalmali (@shalmiaow)

गायिकेच्या लग्नाच्या फोटोंची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. शाल्मलीने फरहानसोबत अत्यंत साधेपणाने लग्न केले आहे. 22 नोव्हेंबर 2021 रोजी सिंगरने फरहानशी त्याच्या घरी लग्न केले. या लग्नाला दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. शाल्मलीच्या लग्नात तिच्या हाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shalmali (@shalmiaow)

शाल्मलीने फोटोची हार घातली आहे.फुल आणि नंतर फोटो असे मिश्रण करून हार बनवल्याचे तुम्ही फोटोत पाहू शकता. सिंगरने ज्या प्रकारची हार घातली आहे तशी हार आजपर्यंत कोणीही घातली नाही. अशा वेळी जर तुम्हालाही फुलांचा हार नको असेल तर तुम्ही शाल्मलीचा लूक ट्राय करू शकता.