'हा' लोकप्रिय गायक आता अभिनयाच्या क्षेत्रात

कोण आहे हा गायक 

'हा' लोकप्रिय गायक आता अभिनयाच्या क्षेत्रात  title=

मुंबई : सिनेसृष्टीत अनेक बदल होत आहेत. आता अनेक कलाकार गाणं गाताना आपल्याला दिसत आहेत. तिथेच अनेक गायक अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. चुंबक या सिनेमांत गायक स्वानंद किरकिरेला आपण प्रसन्न जोशीच्या भूमिकेत पाहिलं आहे. आता असाच एक लोकप्रिय गायक अभिनय करताना दिसणार आहे. हा गायक दुसरा तिसरा कुणी नसून राहुल देशपांडे आहे. 

राहुल देशपांडेने या सिनेमात मोहन जोशींना दिसणाऱ्या तुकारामाची भूमिका साकारली आहे. हा तुकोबा मोहन जोशींना दिसतो. या सिनेमातून राहुल देशपांडे अभिनयाच्या क्षेत्रात आला आहे. राहुल देशपांडेला आपण संगीत नाटकांत अभिनय करताना पाहिलं आहे. ''कट्यार काळजात घुसली', ''संगीत सौभद्र" आणि "मानापमान" यासारख्या संगीत नाटकांमधून आपण त्याचा अभिनय पाहिला आहे. पण राहुलने 'पुष्पक विमान' या सिनेमातून आता अभिनेता म्हणून पदार्पण केलं आहे.