आपल्या मधूर आवाजामुळे ओळखली जाणारी ही गायिका लवकरच अडकणार विवाहबंधनात

गेल्या काही वर्षांपासून दोघेही शांतपणे एकमेकांना डेट (Dating) करत होते आणि अखेर कुटुंबीयांच्या संमतीने त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. पलक मूळची इंदूर (मध्य प्रदेश) येथील आहे, तर मिथुन बॉलीवूडच्या संगीत घराण्यातील आहे.

Updated: Oct 27, 2022, 07:50 PM IST
आपल्या मधूर आवाजामुळे ओळखली जाणारी ही गायिका लवकरच अडकणार विवाहबंधनात title=

Palak Muchhal Marrige: बॉलिवूडमध्ये सध्या चर्चा आहे ती लग्नसराईची. कतरिना, आलिया आणि रिचा यांच्या लग्नसराईनंतर आता अजून एका सेलिब्रेटीचे लग्न येत्या नोव्हेंबरमध्ये होणार आहे. ही बॉलिवूडची एक लोकप्रिय गायिका आहे. गायिका पलक मुच्छाल (Palak Muchhal) आणि संगीतकार मिथुन (Mithun) यांचा विवाह 6 नोव्हेंबरला निश्चित झाला आहे. पलक गेल्या दीड दशकांपासून बॉलिवूड संगीताच्या दुनियेत हे दोघेही सक्रिय आहेत आणि या दोघांची गाणी आजही प्रेक्षक एन्जॉय करतात. 

गेल्या काही वर्षांपासून दोघेही शांतपणे एकमेकांना डेट (Dating) करत होते आणि अखेर कुटुंबीयांच्या संमतीने त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. पलक मूळची इंदूर (मध्य प्रदेश) येथील आहे, तर मिथुन बॉलीवूडच्या संगीत घराण्यातील आहे.

हेही वाचा - Samantha Ruth Prabhu ची डिमांड आणखी वाढली... आता घेणार 'इतके' कोटी रूपयांचं मानधन?

असा असेल लग्नाचा थाट - पलक आणि मिथुनचे लग्न मोठ्या थाटात होणार आहे. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलचे 6, 7 आणि 8 तारखेसाठी बुकिंग करण्यात आले आहे. यामध्ये देश-विदेशातून पाहुणे येणार असून अनेक बॉलिवूड स्टार्स लग्नाचे साक्षीदार होणार आहेत. मुंबईत होणाऱ्या या लग्नाचं रिसेप्शन तीन दिवस चालणार आहे. दोन्ही कुटुंबात लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. पलकचे कुटुंब लग्नासाठी मुंबईत शिफ्ट झाले आहे. पलकच्या आई-वडिलांसोबत तिचा एक भाऊही मुंबईत आला आहे.

हेही वाचा - टेलिव्हिजन अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल... नेपोटिझमवर केलं खरमरीत वक्तव्य

असे घडले दोघांचे करिअर - 

मिथुनने 2005 मध्ये जहर चित्रपटातील 'वो लम्हे' या गाण्याने आपल्या करिअरची सुरुवात केली. 'मर्डर 2', 'जिस्म 2', 'आशिकी 2', 'एक व्हिलन' ते' हाफ गर्लफ्रेंड', 'कबीर सिंग', 'राधे श्याम' आणि 'शमशेरा' यांसारख्या चित्रपटांसाठी त्याने गाणी रचली आहे. पलक मुच्छालने चॅरिटीसाठी गायला सुरुवात केली आणि आपले खाजगी अल्बम आणले. हिमेश रेशमिया स्टारर फिल्म दमदम (2011) मध्ये तिला बॉलिवूडमध्ये गाण्याची पहिली संधी मिळाली. पलकने सलमानच्या 'एक था टायगर' (2012) मध्‍ये गाणे गायले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्याचबरोबर 'आशिकी 2', 'आर... राजकुमार', 'जय हो', 'किक', 'गब्बर इज बॅक', 'बाहुबली: द बिगिनिंग', 'प्रेम रतन धन पायो', 'एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी'पासून अलीकडच्या शमशेरापर्यंतच्या चित्रपटांमध्ये पलकनं गाणं गायलं आहे. पलकने प्रसिद्ध संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले आहे.

वयाच्या चारव्या वर्षी ती त्याच्या लिटल स्टार ग्रुपमध्ये आली होती. लहानपणापासूनच पलकनं गायनाचे धडे गिरवले आहेत. तर मिथुनचे काका प्यारेलाल शर्मा होते. लक्ष्मीकांत - प्यारेलाल हे बॉलिवूड संगीत जगातातले आघाडीचे नावं आहे. मिथुनचे वडील नरेंद्र शर्मा हे म्युझिक अरेंजर होते, त्यांनी 200 हून अधिक चित्रपटांसाठी काम केले होते.