'राज चांगला माणूस... मी ते App पाहिलंय' शिल्पानंतर 'या' सिंगरचा राज कुंद्राला पाठिंबा

या प्रकरणात पोलिस शिल्पा शेट्टीचीही चौकशी करू शकतात

Updated: Jul 21, 2021, 05:14 PM IST
 'राज चांगला माणूस... मी ते App पाहिलंय' शिल्पानंतर 'या' सिंगरचा राज कुंद्राला पाठिंबा title=

मुंबई : शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अश्ली-ल चित्रपट बनवल्याप्रकरणी सोमवारी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने अटक केलं. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केलं असता त्याने आणि त्याचा साथीदार रायन थार्प यांना 23 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे की, राज कुंद्रा हा या प्रकरणातील मुख्य षडयंत्रकर्ता आहे आणि त्याच्याविरूद्ध आमच्याकडे ठाम पुरावे आहेत. या प्रकरणात आता  एका सिंगरने उडी घेतली आहे. 

''मला वाटतं राज कुंद्रा एक चांगली व्यक्ती आहे''
  या प्रकरणात आता सिंगर मिका सिंगने उडी घेतली आहे.  यासंदर्भात एका मुलाखतीमध्ये बोलताना मिका सिंग म्हणाला, "या प्रकरणात पुढे काय होईल याची मी फक्त प्रतीक्षा करत आहे. पाहूया, जे काही होईल ते चांगलं होईल. मला त्यांच्या अ‍ॅपबद्दल फारसे ज्ञान नाही. मात्र मी त्याचं एक अ‍ॅप पाहिलं आहे. हे एक साधं अ‍ॅप होतं. त्याच्या आत फारसं काही नव्हतं, म्हणूनच सर्वोत्तम अपेक्षा करा. मला वाटतं राज कुंद्रा एक चांगली व्यक्ती आहे. आता आपण काय खरं आणि काय खोटं ते पाहूच, या प्रकरणी आता कोर्टच ठरवेल.

शिल्पा शेट्टीची या प्रकरणात चौकशी केली जाऊ शकते
पूनम पांडे, गेहाना वशिष्ठ, कंगना रनौत, मिका सिंग, राखी सावंत यांच्यासह अनेक सेलेब्सनी राज कुंद्राच्या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या प्रकरणात काहीजण राज यांना पाठिंबा देत आहेत, तर बरेचजण त्यांच्याविरूद्ध बोलत आहेत. राज कुंद्रा यांना भायखळा तुरुंगात नेण्यात आलं आहे. या प्रकरणात पोलिस शिल्पा शेट्टीचीही चौकशी करू शकतात. कारण शिल्पा बहुतेक व्यवसायात पती राज कुंद्राची पार्टनर आहे. त्यामुळे मुंबई क्राईम ब्रांच लवकरच तिला हजर होण्यास समन्स बजावू शकते.