प्रसिद्ध गायक कुमार सानू कोरोनाच्या विळख्यात

गेल्या ९ महिन्यांपासून आहेत कुटुंबापासून दूर 

Updated: Oct 16, 2020, 06:54 PM IST
प्रसिद्ध गायक कुमार सानू कोरोनाच्या विळख्यात  title=

मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. या धोकादायक व्हायरसची झळ सर्व सामान्य जनतेसह सेलिब्रिटींना देखील बसली आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी कोरोना व्हायरसवर मात केली आहे. आता बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कुमाक सानू यांना देखील कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांनी फेसबूकवर पोस्ट करत आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. 

कुमार सानू १४ ऑक्टोबर रोजी परदेशात आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी जाणार होते, परंतू आता त्यांना कोरोनामुळे त्यांच्या कुटुंबाला भेटता येणार नाही. गेल्या काही महिन्यांपासून देशातच नाही तर संपूर्ण जगात कोरोनाने हाहाःकार माजवला आहे. तर लॉकडाऊनमुळे कुमार सानू गेल्या ९ महिन्यांपासून कुटुंबापासून दूर आहेत 

तर भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. गेल्या ६३ हजार ३७१ नवे करोना रुग्ण आढळले असून ८९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या भरतात कोरोना रूग्णांची संख्या  ७३ लाख ७० हजार ४६९ वर पोहोचली आहे.