भर कार्यक्रमात सिंगरवर का आली अशी वेळ, दारुच्या बाटल्यांनी झाकलं अंग?

 काहींनी स्वतःला पिझ्झासारखे तर काहींनी फ्रेंच फ्राईससारखे बनवले होते.

Updated: Jan 2, 2022, 01:57 PM IST
भर कार्यक्रमात सिंगरवर का आली अशी वेळ, दारुच्या बाटल्यांनी झाकलं अंग? title=

मुंबई : अमेरिकन गायिका केटी पेरीने नुकतेच लास वेगास येथे एका सिंगिंग शोमध्ये भाग घेऊन लोकांचे लक्ष वेधून घेतले. खरंतर, या शोमध्ये तिने असा ड्रेस घातला होता की त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सतत पाहीला जात आहे. वास्तविक, केटी पेरीने परफॉर्मन्स दरम्यान बिअर ब्रा परिधान केली होती, तिच्या या स्टाईलने इंटरनेटवर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. 

सिंगरची ही कोणती नवी स्टाईल?

अशा विचित्र फॅशनमुळे अनेकजण आश्चर्यचकीत झाले आहेत. कारण परफॉर्मन्समध्ये बिअर कॅन केवळ कॅटीच्या ड्रेसवरच नाही तर स्टेजवरही उपस्थित होत्या. ती एका मोठ्या बिअर कॅनवर उभी राहून नाचताना दिसत होती. यासह, तिच्याभोवती नाचणाऱ्यांपैकी काहींनी स्वतःला पिझ्झासारखे तर काहींनी फ्रेंच फ्राईससारखे बनवले होते.

सिंगर ने स्टेज शो में पहनी बियर कैन से बनी ब्रा, अजीबोगरीब लुक देख लोग हुए घनचक्कर

लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया 

कॅटी रिसॉर्ट्स वर्ल्ड लास वेगासमध्ये 'प्ले'च्या पहिल्या रात्री परफॉर्म करत होती. नवीन वर्षाच्या रात्री झालेल्या या कार्यक्रमात तिची ही नवीन शैली लोकांना आवडली.

कमेंट सेक्शनमध्ये लोक तिच्या परफेक्ट स्टाईलबद्दल बोलत आहेत. फॉक्स न्यूजनुसार, ती स्टेजवर बसली आणि तिचा ड्रेस व्यवस्थित दाखवून लागली.

या गाण्यांवरून ओळख 'कॅलिफोर्निया गर्ल्स', 'टीनएज ड्रीम', 'फायरवर्क', 'ईटी' आणि 'लास्ट फ्रायडे नाईट (TGIF)' ही तिची हिट गाणी आहेत. संगीताव्यतिरिक्त कॅटी पेरीचे आत्मचरित्र 'कॅटी पेरी: पार्ट ऑफ मी' आहे, जे 2012 मध्ये प्रकाशित झाले.