मुंबई : ज्येष्ठ गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर यांना 8 जानेवारीपासून ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यादरम्यान त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याचे वृत्त आहे. 92 वर्षीय लता मंगेशकर यांना कोरोना संसर्गासोबतच न्यूमोनियाही झाला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यांच्या तब्येतीबद्दल आता गायिका आशा भोसले यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत.
एका मुलाखतीदरम्यान आशा भोसले यांना बहीण लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबद्दल विचारण्यात आले, तेव्हा आशा जी म्हणाल्या की 'नाही, नाही, मी भाबी, अर्चना आणि उषा यांच्याशी 30 मिनिटांपूर्वी बोलले होते.' त्या म्हणाल्या आपण सर्वांनी दीदींच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली पाहिजे.
आशा भोसले पुढे म्हणाल्या, 'त्या आमच्या कुटुंबातील प्रत्येकाच्या आईप्रमाणे आहे. त्यांच्या घरी भगवान शिवाचा रुद्र स्थापित केला आहे आणि त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली जात आहे.
त्याचवेळी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रविवारी सांगितले की, लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. राजेश टोपे म्हणाले, 'लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मी ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या अधिकार्यांशी बोललो ज्यांनी मला त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट केले.
मी त्यांना सांगितले की हॉस्पिटलच्या प्रवक्त्याने गायिकेच्या प्रकृतीबद्दल अपडेट द्यावा कारण लोकांना त्याच्या प्रकृतीबद्दल जाणून घ्यायचे आहे. लता मंगेशकर यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतरच रुग्णालय त्यांच्या प्रकृतीबाबत अपडेट देऊ शकेल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
लता मंगेशकर यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून काम करायला सुरुवात केली. त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये काम केले. लता मंगेशकर यांनी 1942 मध्ये वयाच्या 13 व्या वर्षी त्यांच्या करिअरला सुरुवात केली होती. त्यांनी अनेक भारतीय भाषांमध्ये 30,000 हून अधिक गाणी गायली आहेत.