लाईव्ह शो मध्ये गाताना राग अनावर झाल्याने अरिजीत सिंगने दिली शिवी...

आपल्या सुरेल आवाजाने सर्वांचे मन जिंकणारा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगचा एक व्हिडिओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 19, 2018, 02:19 PM IST
लाईव्ह शो मध्ये गाताना राग अनावर झाल्याने अरिजीत सिंगने दिली शिवी... title=

नवी दिल्ली : आपल्या सुरेल आवाजाने सर्वांचे मन जिंकणारा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगचा एक व्हिडिओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अरिजीत स्टेजवरून जोरात ओरडत शिवी देताना दिसत आहे. 
रोमॉटींक गाण्यांनी सर्वांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या अरिजीत सिंगचा हा वेगळाच चेहरा समोर आला आहे. आतापर्यंत शांत, संयमी वाटणाऱ्या अरिजीत हा व्हिडिओबद्दल सर्वांना आश्चर्य वाटत आहे.

व्हिडिओ व्हायरल होत आहे

शांत, संयमी असलेल्या अरिजीतचा हा अवतार अनेकांना संभ्रमात टाकणारा असून त्याचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओ खूप जूना असल्याचे दिसते. तरी देखील लोकांनी अरिजीतला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. व्हिडिओ जूना असला तरी यातून त्याचा एक वेगळा चेहरा त्याच्या चाहत्यांसमोर आला आहे.

Arijit Singh

काय आहे व्हिडिओत ?

एका कॉन्सर्टमध्ये अरिजीत सिंग 'नादान परिंदे' हे गाणे गात आहे. तेव्हाच त्याचा माईक स्टॅँडवरून पडतो. त्यानंतर अरिजीत भडकला आणि त्याने मंचावरूनच शिव्या द्यायला सुरूवात केली. अरिजीतचा हा अवतार पाहुन कॉन्सर्ट संचालक ताबडतोब तिथे पोहचले आणि त्यांनी माईक ठीक केला.

सलमानसोबतही पंगा

हा व्हिडिओ कधीचा आहे आणि केव्हा ही घटना झाली, याबद्दलची काही माहिती नाही आहे. मात्र हा व्हिडिओ अरिजीतच्या सुरूवातीच्या दिवसातला आहे. इतकंच नाही तर अरिजीतने चक्क दबंग खान सलमानशी ही पंगा घेतला आहे.

फेसबुकवर मागीतली माफी

सलमानशी झालेल्या पंग्याबद्दल अरिजीतने फेसबुकवर सलमान खानची माफी मागितली आहे. त्यानंतर त्याने सलमानच्या सुलतान चित्रपटासाठी 'जग घुमिया' हे गाणे गायले. मात्र सलमाने चित्रपटातील अरिजीतने गायलेले व्हर्जन कट केले.