सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा प्रेमात? नक्की काय आहे प्रकरण

Sidharth Jadhav : सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा प्रेमात? नक्की काय आहे प्रकरण एकदा पाहाच...

Updated: Feb 12, 2024, 06:15 PM IST
सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा प्रेमात? नक्की काय आहे प्रकरण title=
(Photo Credit : Social Media)

Sidharth Jadhav song from Lagna Kallol : मयुरी देशमुख, सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान यांच्या लग्नाचा कल्लोळ प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. दरम्यान या चित्रपटातील ‘झणझणल्या काळजा वरती’ हे झणझणीत गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. मयुरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधव यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले हे धमाकेदार गाणे आदर्श शिंदे यांनी गायले आहे. तर जय अत्रे यांचे जबरदस्त बोल लाभलेल्या या गाण्याला प्रफुल्ल कार्लेकर आणि स्वप्नील गोडबोले यांचे उत्स्फूर्त संगीत लाभले आहे. प्रत्येकाला थिरकायला लावणाऱ्या या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन प्रिन्स याने केले आहे. 

सिद्धार्थ जाधवचा एक वेगळाच लूक या चित्रपटात पाहायला मिळत आहे. या गाण्यातून याच्या काळजातील मयुरीविषयीची भावना, प्रेम तो व्यक्त करत आहे. हे जबरदस्त गीत ऐकायला जितके मस्त वाटते तितकेच पाहायलाही कमाल आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॅा. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर ‘लग्नकल्लोळ’चे दिग्दर्शन मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॅा. मयुर आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे यांनी केले आहे. जितेंद्रकुमार परमार लिखित हा चित्रपट येत्या 1 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

या गाण्याबद्दल डॅा. मयुर आण्णासाहेब तिरमखे म्हणतात, "अतिशय एनर्जेटिक असे हे गाणे आहे. सिद्धार्थ जाधव, आदर्श शिंदे ही जोडी एकत्र आल्याने या गाण्यातील उत्साह द्विगुणित झाला आहे. त्यात या गाण्याच्या शब्दांनी आणि संगीताने अधिकच भर टाकली आहे. सिद्घार्थ आणि मयुरीची अफलातून केमिस्ट्री या गाण्यातून दिसत आहे. मला आशा आहे, पहिल्या गाण्याप्रमाणेच हे गाणेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल."

हेही वाचा : आधी माईकनं मारलं, नंतर फोन हिसकावून घेत फेकला'; कॉन्सर्ट सुरु असतानाच आदित्य नारायण चाहत्यावर संतापला

या आधी देखील एक गाणं प्रदर्शित झालं होतं. हे गाणं मेहंदी समारंभातील असूनृ अतिशय कलरफुल आहे. यातून लग्नाचा माहोल, सनई चौघडे, पाहुण्यांची लगबग, तरुणाईचा उत्साह, मजा मस्ती धमाल दिसत आहे.  कपड्यांची रंगसंगती, नृत्य दिग्दर्शन या सगळ्याच गोष्टी नजरेला सुखावणाऱ्या आहेत. मयुरी आणि भूषणवर चित्रित झालेले हे गाणं अवधूत गुप्ते आणि जुईली जोगळेकर यांनी गायले असून या गाण्याला स्वप्नील गोडबोले, प्रफुल कार्लेकर यांचे उत्स्फूर्त संगीत लाभले आहे. तर मंदार चोळकर यांनी हे गाणे शब्दबद्ध केले आहे, तर ह्याचे नृत्य दिग्दर्शन डान्स इंडिया डान्स फेम प्रिन्स यांनी केले आहे.