मुंबई : टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं (Sidharth Shukla) निधन झाल्यानंतर त्याचं कुटुंब आणि त्याची गर्लफ्रेन्ड शेहनाज गिल यांच्यावर मोठं संकट कोसळलं आहे. या दुःखातून ते अद्यापही सावरले नाहीत. 2 सप्टेंबर रोजी सिद्धार्थने वयाच्या 40 व्या वर्षी अखेरचा श्वास घतेला. सिद्धार्थच्या निधनानंतर त्याच्या आणि शेहनाजच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी मित्र परिवार येत आहे. सिद्धार्थच्या निधनानंतर चाहत्यांना शेहनाजची चिंता सतावत आहे. शेहनाज आणि सिद्धार्थ यांच्यातील नात्याबद्दल प्रत्येकाला माहिती. दोघे कायम इतरांना कपल गोल्स देत असे.
परंतू आता सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाज पूर्णपणे कोलमडली आहे. ती या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे नुकताचं अभिनव शुक्ला (Abhinav Shukla) आणि रुबीना दिलैक यांनी शेहनाज आणि तिच्या आईची भेट घेतली. यावेळी अभिनव म्हणाला शेहनाज सध्या स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे.
'मी प्रार्थना करतो की शेहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्लाच्या कुटुंबाला देवाने बळ द्यावं...'
टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने 'बिग बॉस 13' सिझन आपल्या नावावर केलं. त्यानंतर 'खतरो के खिलाडी'मध्ये देखील त्याने विजय मिळवला. फक्त रियालिटी शो नाही तर सिद्धार्थने अनेक मालिकांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली. 'बालिका वधू' मालिकेच्या माध्यमातून तो घरा-घरात पोहोचला आणि प्रेक्षकांच्या मनात त्याने घर केलं. चाहत्यांच्या मनात राज्य करणाऱ्या सिद्धार्थने अखेर जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे.
12 डिसेंबर 1980 रोजी जन्मलेला सिद्धार्थ आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आला. एका मॉडेलच्या रूपात त्याने करियरला सुरूवात केली. त्यानंतर 2004 साली त्याने अभिनयात पदार्पण केलं. 2008 रोजी त्याने 'बाबुल का आंगन छूटे' या मालिकेत दिसला. पण सिद्धार्थला लोकप्रियता 'बालिका वधू' मालिकेच्या माध्यमातून मिळाली.