सिद्धार्थ शुक्लाचं आवडतं गाणं गात राहुल वैद्यने वाहिली श्रद्धांजली, भावूक करणारा VIDEO

राहुल वैद्यने सिद्धार्थ शुक्लाला वाहिली अनोखी श्रद्धांजली

Updated: Sep 5, 2021, 04:41 PM IST
सिद्धार्थ शुक्लाचं आवडतं गाणं गात राहुल वैद्यने वाहिली श्रद्धांजली, भावूक करणारा VIDEO title=

मुंबई : गेल्या गुरुवारचा दिवस टीव्ही क्षेत्रासाठी अत्यंत दुःखाचा होता. या क्षेत्राने प्रसिद्ध आणि हिट स्टार सिद्धार्थ शुक्ला कायमचा गमावला. सिद्धार्थ शुक्ला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्या मृत्यूमुळे चाहते आणि जवळचे लोकांना धक्का बसला आहे. अनेक टीव्ही स्टार्स सिद्धार्थ शुक्लाच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचले आणि दिग्गज अभिनेत्याला विशेष प्रकारे श्रद्धांजली वाहिली.

दिवंगत अभिनेत्याच्या अनेक मित्रांनी त्याची एक विशेष प्रकारे आठवण केली आणि त्यांना विशेष गोष्टी समर्पित केल्या. बिग बॉस 14 चे स्पर्धक आणि प्रसिद्ध गायक राहुल वैद्य याने ही सिद्धार्थ शुक्लाची आठवण काढली. एवढेच नाही तर राहुलने आपले आवडते गाणे त्याच्यासाठी समर्पित केले आहे. राहुल वैद्य सिद्धार्थ शुक्लासाठी गाणे गात असल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

राहुलच्या गाण्याचा व्हिडिओ बिगबॉससॉट नावाच्या इन्स्टाग्राम हँडलने शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये राहुल वैद्य सांगतोय की, सिद्धार्थ शुक्लाचे आवडते गाणे 'तू जाने ना' आहे. हे गाणे 'अजब प्रेम की गजब कहानी' चित्रपटातील आहे. व्हिडिओमध्ये राहुल वैद्य याने हे गाणे सिद्धार्थ शुक्लासाठी गायले आहे आणि म्हणतो, 'हे गाणे खास मित्रासाठी आहे ज्याचे काल निधन झाले. आम्ही त्याला गमावले.

राहुल वैद्य पुढे व्हिडिओमध्ये म्हणतो की, 'मी खूप जवळचा मित्र होतो. हे त्याचे आवडते गाणे आहे. मला हे गाणे गाण्याची इच्छा नव्हती, परंतु मला त्याच्यासाठी गाण्याची इच्छा आहे. राहुल वैद्य सिद्धार्थ शुक्लासाठी गात असल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दिवंगत अभिनेता आणि राहुल वैद्य याचे चाहते या व्हिडिओला लाईक करत आहेत. तसेच कमेंट करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Big Boss OTT (@bigbossott)

सिद्धार्थ शुक्ला याचे 2 सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांचे अंतिम संस्कार मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत करण्यात आले. यावेळी बिग बॉस 13 शी संबंधित अनेक स्पर्धक त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते. यामध्ये आरती सिंह, रश्मी देसाई, अर्जुन बिजलानी, निक्की तांबोळी आणि जन कुमार सानू यांचा समावेश होता. यावेळी शहनाज गिल खूप भावूक दिसत होती.