2 वेळा संसार मोडल्यानंतर श्वेता करते हे काम... तिच्या आईकडून मिळाला तिला हा वारसा

'कसौटी जिंदगी की' या मालिकेतून घरोघरी पोहचणारी श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहऱ्यापैकी एक आहे.

Updated: Oct 22, 2022, 05:31 PM IST
2 वेळा संसार मोडल्यानंतर श्वेता करते हे काम... तिच्या आईकडून मिळाला तिला हा वारसा title=
Shweta does this work after breaking up the world 2 times nz

Shweta Tiwari :  'कसौटी जिंदगी की' (Kasautii Zindagi Kay) या मालिकेतून घरोघरी पोहचणारी श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहऱ्यापैकी एक आहे. ती तिच्या वैयक्तिक आयुष्याला घेऊन जास्तच चर्चेत असते. सध्या ती  'मैं हूं अपराजिता' मध्ये तीन मुलींच्या आईची भूमिका साकारत आहे, तिने खुलासा केला आहे की तिला पुस्तके वाचण्याची खूप आवड आहे आणि ती म्हणाली की चांगली कादंबरी वाचल्याने तणाव कमी होण्यास मदत होते. ती म्हणते, “जेव्हा मला मोकळा वेळ मिळतो तेव्हा मला चांगले पुस्तक वाचायला आवडते. माझे शूटिंगचे वेळापत्रक व्यस्त असले तरीही, एक मनोरंजक कादंबरी वाचणे मला नेहमीच आनंदी आणि तणावमुक्त करते."  (Shweta does this work after breaking up the world 2 times nz)

हे ही वाचा - अनुराग कश्यपमुळे 'या' अभिनेत्रीच स्वप्न झालं साकार, कोण आहे 'ही' अभिनेत्री? 

 

श्वेता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत असतात. अनेकदा तिच्या पोस्टवर चाहते कमेंट करतात पण काही वेळेस चाहते तिला ट्र्रोल देखील करतात. तुम्हाला माहितेय का श्वेता तिवारी 42 वर्षाची आहे तिचे फिटनेस जबरदस्त आहे. ती अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यावर बिनधास्त भाष्य करताना दिसते.  

ती 'बिग बॉस 4' ची विजेती देखील होती आणि त्यानंतर 'खतरों के खिलाडी 11' मध्ये भाग घेतला होता. 'हम, तुम और थे' या चित्रपटातून तिनं डिजिटल डेब्यू केला. अभिनयाव्यतिरिक्त, श्वेता तिच्या पुस्तक वाचनाच्या छंदासाठी थोडा वेळ काढते आणि ही सवय तिच्या आईकडून मिळाल्याबद्दल बोलते. ते पुढे म्हणाले, “लहानपणी मला पुस्तके वाचनाची आवड होती आणि मला विश्वास आहे की मला माझ्या आईकडून पुस्तकांबद्दलचा वारसा मिळाला आहे. 

आणखी वाचा - सैफ-करीनामध्ये वाद? 'तो' बॉलिवूड अभिनेता ठरला कारण

तिनं तिच्या आवडत्या पुस्तकांविषयी सांगितले. “मला भारतीय आणि युरोपियन इतिहासाबद्दल वाचायला आवडते. तुम्ही मला माझ्या सध्याच्या आवडीबद्दल विचारल्यास, ते पाउलो कोएल्होचे 'द अल्केमिस्ट', युवलचे 'सेपियन्स' आहेत. 42 वर्षीय अभिनेत्री पुढे म्हणाली, “मला क्रिस्टिन हॅना आणि कॉलीन हूवर यांच्या कादंबऱ्या वाचायलाही आवडतात.