Vijay Deverakonda : 'गप्प बस आणि सिनेमा बघ', विजय देवरकोंडाने केली रजनीकांतची पाठराखण!

Vijay Deverakonda News: विजय देवरकोंडा त्याच्या आगामी रोमँटिक ड्रामा अशा कुशी चित्रपटासाठी चर्चेत आहे. देवरकोंडाने साऊथच्या दोन ज्येष्ठ स्टार्सबद्दल असं काही वक्तव्य केलंय की देवरकोंडा सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

Updated: Aug 22, 2023, 07:17 PM IST
Vijay Deverakonda : 'गप्प बस आणि सिनेमा बघ', विजय देवरकोंडाने केली रजनीकांतची पाठराखण! title=
Vijay Deverakonda kushi movie 2023

Vijay Deverakonda React on Chiranjeevi And Rajinikanth: साऊथ इंडियन सुपरस्टार विजय देवरकोंडा त्याच्या आगामी रोमँटिक ड्रामा अशा कुशी चित्रपटासाठी चर्चेत आहे आणि त्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 1 सप्टेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याने आता सोशल मीडियावर तुफान चर्चा देखील होताना दिसत आहे. अशातच आता देवरकोंडाने सोशल मीडियावर साऊथच्या दोन ज्येष्ठ स्टार्सबद्दल असं काही वक्तव्य केलंय की देवरकोंडा (Vijay Deverakonda) सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

अलीकडेच एका पत्रकाराने विजयला कुशीच्या कार्यक्रमादरम्यान चिरंजीवी आणि रजनीकांतबद्दल नकारात्मक प्रश्न विचारले होते आणि त्यावर अभिनेत्याने त्याला जोरदार उत्तर दिलं. सुपरस्टार रजनीकांत आणि चिरंजीवी हे दोघंही हिट आणि फ्लॉपच्या पलीकडील सुपरस्टार आहेत. रजनीकांत सरांनी बॅक टू बॅक 5-6 फ्लॉप दिलेत. पण ते जेलर सारख्या ब्लॉकबस्टरसह परत आले आहेत. मग आपण शांत राहून बघायला हवं, असं मत देवरकोंडा (Vijay Deverakonda) याने मांडलं आहे.

पाहा Video

चिरंजीवीचे बॅक टू बॅक 6-7 फ्लॉप असू शकतात. पण योग्य दिग्दर्शकाला त्यांची उर्जा मिळाली तर ते बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतील. ते इंडरस्ट्रीमध्ये आल्यावर अॅक्शन, डान्स आणि परफॉर्मन्स पूर्णपणे बदलून गेला. त्यांनी अनेकांना इंडरस्ट्रीमध्ये येण्यासाठी प्रेरित केलंय. हिट आणि फ्लॉपच्या आधारावर कलाकारांना न्याय देऊ नये, असंही देवरकोंडा म्हणाला आहे.

आणखी वाचा - सामंथा-विजय देवरकोंडा प्रेमात? रील लाइफमध्ये रोमान्स करता-करता रिअल लाइफमध्ये आले एकत्र

दरम्यान, प्रत्येकाला चित्रपट या कलेचा आनंद घेता यावा म्हणून अनेकांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळते. त्यामुळे त्यांचा आदर आपण केला पाहिजे. ज्येष्ठ अभिनेत्यांवर भाष्य करणं मला अनादराचं वाटतं, असंही देवरकोंडा म्हणाला आहे. देवरकोंडाचे हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. त्याचे रिल्स देखील तुफान शेअर होत आहेत.