श्रीरामानंतर आता Arun Govil साकारणार 'या' देवाची भूमिका, महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन

Arun Govil : रामानंद सागर यांच्या रामायणातून श्री रामाची भूमिका करुन सर्वांच्या हृदयात घर करणारे अभिनेता अरुण गोविल लवकरच पुन्हा एकदा देवाची भूमिका साकारणार आहेत. या देवाचं महाराष्ट्राशी खास कनेक्शन आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jul 26, 2023, 02:58 PM IST
श्रीरामानंतर आता Arun Govil साकारणार 'या' देवाची भूमिका, महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन title=
Shri Ram ramayan arun govil will play lord vitthal sant tukaram Maharashtra entertainment news in marathi

Arun Govil : रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेत अरुण गोविल यांनी श्रीरामांची साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. त्यांची ती भूमिका इतकी गाजली होती की त्यामुळे देशातील कोट्यवधी नागरिकांचं गोविल यांच्याशी भावनिक नातं आहे. ते कुठेही बाहेर गेले की लोक त्यांना श्रीराम समजून त्यांच्या पाया पडतात. श्रीराम म्हटल्यावर अरुण गोविल यांचं रुप डोळ्या समोर येतं. अरुण गोविलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ते आता अजून एका देवाची भूमिका साकारणार आहेत. या देवाचं महाराष्ट्राशी खास कनेक्शन आह. (Shri Ram ramayan arun govil will play lord vitthal sant tukaram Maharashtra entertainment news in marathi)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मीडिया रिपोर्ट्सनुसार अरुण गोविली महाराष्ट्राचा आराध्यदैवत विठ्ठलाची भूमिका साकारण आहे. संत तुकाराम चित्रपटात ते विठुरायाचा भूमिकेत दिसणार आहेत. या भूमिकेबद्दल अरुण गोविल मीडियाशी बोलताना म्हणाले की, ते या भूमिकेसाठी खूप उत्सुक आहेत. 

अरुण गोविल म्हणाले की, '''रामायण' नंतर त्यांना धार्मिक चित्रपटांमध्ये भूमिका करण्याच्या अनेक ऑफर्स त्यांना आल्यात. मात्र त्यांनी त्या नकारल्यात. पण संत तुकारामांमुळे त्यांनी ही भूमिका स्विकारली असल्याचं ते म्हणाले. संत तुकारामांचा मान महाराष्ट्रभर आहे. ते एक समाजसुधारक होते आणि त्याच बरोबर भगवंताची भक्ती होते, म्हणून ही भूमिका मला साकारायला आवडणार आहे.'' दरम्यान 'संत तुकाराम' हा आदित्य ओमचा चित्रपट आहे. 

 

तरदुसरीकडे तब्बल 35 वर्षांनंतर सीता आणि राम एकत्र दिसणार आहे. म्हणजेच दीपिका चिखलिया आणि अरुण स्क्रीनवर पुनरागमन करत आहेत. 'नोटीस' या चित्रपटात दोघं भूमिका साकारणार आहेत.
 
दीपिका यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, "कोरोनानंतर आम्ही अनेकदा एकत्र आलो. मात्र चित्रपटात आम्ही बऱ्याच काळानंतर एकत्र काम करणार आहोत. बरंच बदल झाले आहेत. त्यावेळी आम्ही खूप तरुण होतो. आता आम्ही दोघांचंही वय वाढलं आहे", असं त्या म्हणाल्या.