'10 रुपये की पेप्सी, श्रद्धा कपूर से*सी; स्टेजवरच Shraddha Kapoor झाली शॉक

Shraddha Kapoor ही सध्या 'तू झूठी मैं मक्कार' या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या निमित्तानं ती अहमदाबाद येथे पोहोचली होती. तिथलाच हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत श्रद्धाला पाहताच तिथे उपस्थित असलेल्या पोरिंनी कसं रिअॅक्ट केले आहे ते पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

Updated: Mar 2, 2023, 05:08 PM IST
'10 रुपये की पेप्सी, श्रद्धा कपूर से*सी; स्टेजवरच Shraddha Kapoor झाली शॉक title=

Shraddha Kapoor Viral Video : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या तिचा आगामी चित्रपट 'तू झूठी मैं मक्कार' च्या (Tu Jhoothi Main Makkaar) प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूरसोबत अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. श्रद्धा आणि रणबीरला पहिल्यांदा स्क्रिन शेअर करताना पाहण्यासाठी त्यांचे चाहते उस्तुक आहेत. अशात चित्रपटाचे प्रमोशन करण्यात दोघेही व्यस्त आहेत. दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी श्रद्धा अहमदाबाद येथे एका मॉलमध्ये पोहोचली होती. या दरम्यान, तिच्या महिला चाहत्यांनी तिचं ज्या प्रकारे स्वागत केलं ते पाहून श्रद्धाला हसू अनावर झालं आहे. 

श्रद्धा कपूरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. श्रद्धाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. यात श्रद्धानं गुलाबी रंगाचा टॉप परिधान केला आहे. सगळ्यात आधी श्रद्धा स्टेजवर उभी असून तिचं अचानक लक्ष हे स्टेजच्या जवळ असलेल्या मुलींकडे जातं. त्यांना पाहून श्रद्धा बोलते तुम्ही काय बोलत आहात हे मला ऐकायचे आहे. त्यावर त्या मुलींचा ग्रुप माईक घेऊन बोलतो की '10 रुपये की पेप्सी, श्रद्धा कपूर सेक्सी।' हे ऐकताच श्रद्धा लाजते आणि हसू लागते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या श्रद्धाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'त्या मुली ज्या बोलल्या आहेत ते खरंच आहे... पण श्रद्धा कपूर खूप मेहनत देखील घेते.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'श्रद्धा कपूर खरंच खूप क्यूट आहे', अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी श्रद्धा आणि तिच्या या व्हिडीओवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 

हेही वाचा : Allu Arjun नं दिला होता Shah Rukh Khan च्या 'जवान'ला नकार!

'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि पटकथा ही लव रंजन यांनी केलं आहे. या चित्रपटाची निर्मिती ही लव फिल्म्स आणि टी-सीरीज फिल्म्स बॅनरच्या अंतर्गत करण्यात आली आहे. इतकंच काय तर या चित्रपटात श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर व्यतिरिक्त अनुभव सिंग बस्सी, डिंपल कपाडिया आणि बोनी कपूर देखील दिसणार आहेत. चित्रपटातील सगळ्या गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ही सगळी गाणी प्रीतमनं संगीतबद्ध केली आहेत. तर अमिताभ भट्टाचार्या यांनी लिहिली आहेत. हा चित्रपट 8 मार्च 2023 रोजी होळीला प्रदर्शित होणार आहे.