...या कारणामुळे श्रद्धा कपूर कॉफी विथ करणमध्ये जाणार नाही

हे आहे खरं कारण 

...या कारणामुळे श्रद्धा कपूर कॉफी विथ करणमध्ये जाणार नाही  title=

मुंबई : फिल्ममेकर करण जोहर आपला चॅट शो 'कॉफी विथ करण'च्या सहाव्या सिझनमुळे सध्या खूप चर्चेत आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक गोष्टींचा खुलासा या शोमध्ये होत असल्यामुळे हा शो लोकप्रिय झाला आहे. आता अशी माहिती मिळाली आहे की, बॉलिवूडमधील हसीना श्रद्धा कपूरने मात्र या लोकप्रिय शोमध्ये येण्यास नकार दिला आहे. 

अशी चर्चा आहे की, या शोमध्ये येऊन ती आपल्या पर्सनल लाइफबद्दल बोलू इच्छित नाही. तिला या गोष्टीची भीती आहे की आपल्या आयुष्यातील खाजगी गोष्टी सगळ्यांसमोर येतील. 

मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा कपूरला कॉफी विथ करण या शोमध्ये येण्यासाठी आमंत्रण पाठवण्यात आलं होतं. पण तिने सरळ यासाठी नकार दिला आहे. आता यावर अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत की, श्रद्धाने नकार देण्याच कारण काय? 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

@tanghavri @shraddha.naik @menonnikita

A post shared by Shraddha (@shraddhakapoor) on

श्रद्धा कपूर आपल्या खाजगी आयुष्यावर अशा भर कार्यक्रम बोलू इच्छित नाही. यामुळे पहिल्यापासूनच तिने या कार्यक्रमाला नकार दिला आहे. आता अशी चर्चा आहे की, श्रद्धा कपूरच्या जागेवर भूमी पेडणेकर येणार आहे. श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तर यांची लव्हस्टोरी इंडस्ट्रीत खूप लोकप्रिय होती. त्यांच्या या अफेअर अभिनेता आणि श्रद्धाचे वडिल शक्ती कपूर यांचा विरोध होता. आता हे दोघं एकत्र राहत नाहीत. सध्या फरहान अख्तर शिबानी दांडेकरला डेट करत आहे.