Shraddha Kapoorच्या बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियाचा वाढला पारा

श्रद्धा कपूरने लेटेस्ट फोटोशूटचे (photoshoot) काही फोटो इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर केले आहेत. श्रद्धाच्या या फोटोमुळे सोशल मीडियाचं तापमान वाढलं आहे. 

Updated: Sep 18, 2022, 10:54 AM IST
Shraddha Kapoorच्या बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियाचा वाढला पारा  title=
shraddha kapoor Bold photo Trending on Twitter nm

Shraddha Kapoor: 'आशिकी गर्ल' (Aashiqui Girl) अभिनेत्री श्रद्धा कपूर सोशल मीडियावर (Social media) सक्रीय असते. सध्या ती कुठल्याही चित्रपटात दिसत नाही आहे पण सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे.  येत्या काही दिवसांमध्ये श्रद्धा कपूर 'बड़े मियाँ छोटे मियाँ'(Bade Miyan Toh Bade Miyan), 'नागिन' (Naagin), 'स्त्री 2' (Stree 2), 'चालबाज इन लंडन' (Chaalbaaz in London) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. श्रद्धा कपूर सोशल मीडियावर कायम साडी, सलवार सूटमध्ये दिसते. तिचा मराठमोळा साडी आणि नथमधील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. 

पण श्रद्धा कपूरने लेटेस्ट फोटोशूटचे (photoshoot) काही फोटो इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर केले आहेत. श्रद्धाच्या या फोटोमुळे सोशल मीडियाचं तापमान वाढलं आहे. हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. श्रद्धा कपूरने ब्लॅक साईनिंग आउटफिट (black thigh high slit gown) घालून एक साधे पण बोल्ड फोटोशूट (Bold photoshoot) केलं आहे. (shraddha kapoor Bold photo Trending on Twitter nm)

श्रद्धाचा फोटो पोस्ट होताच इन्स्टाग्रामचा (instagram)पारा वाढला आहे. श्रद्धाने इंस्टाग्रामवर 3 फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये श्रद्धाने थाई हाय स्लिट गाऊन घातलेला दिसत आहे. ब्लॅक कलरच्या या ड्रेसमध्ये श्रद्धा खूपच कमालीची सुंदर आणि हॉट दिसत आहे. चाहत्यांना श्रद्धाचे हे फोटो खूप आवडले आहेत. श्रद्धाच्या या फोटोंना काही मिनिटांतच लाखो लाईक्स मिळाले आहेत. इतकंच नाही तर श्रद्धाचे हे फोटो ट्विटरवर ट्रेंड (Trending on Twitter) करत आहेत. दीड हजारांहून अधिक लोकांनी हे फोटो पोस्ट केले आहेत.

या ड्रेसमधील तिचे ब्लॅक अँड व्हाइट (Black and white)फोटो शेअर करताना श्रद्धाने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये व्हाइट अँड ब्लॅक हार्ट्ससोबत "करंट मूड" असं लिहिलं आहे. आता श्रद्धा #ShraddhaKpoor टॅगसह ट्रेंड करत आहे.