'शूटर दादी' चंद्रो तोमर यांचे कोरोनामुळे निधन; भूमी, तापसी यांनी व्यक्त केलं दुःख

देशात कोरोनाची परिस्थिती दिवसागणिक भयंकर होत आहे.

Updated: Apr 30, 2021, 06:55 PM IST
'शूटर दादी' चंद्रो तोमर यांचे कोरोनामुळे निधन; भूमी, तापसी यांनी व्यक्त केलं दुःख  title=

मुंबई : देशात कोरोनाची परिस्थिती दिवसागणिक भयंकर होत आहे. देशात कोरोना रूग्णांची संख्या तर वाढतचं आहे, पण कोरोनामुळे मृत पावणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. उत्तर प्रदेशातील बागपतच्या प्रसिद्ध नेमबाज चंद्रो तोमर यांचे कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यांना 'शूटर दादी' म्हणून देखील ओळखलं जात होतं. चंद्रो तोमर आणि प्रकाशी तोमर या वृद्ध असूनही हातात बंदुक घेतली आणि निशाणा साधला. त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेवून आपलं कौशल्य जगाच्या समोर आणलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bhumi  (@bhumipednekar)

चंद्रो तोमर आणि प्रकाशी तोमर यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक देखील तयार करण्यात आला. त्यांच्या बायोपिकचं नाव 'सांड की आंख' असं आहे.  बायोपिकमध्ये अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत झळकल्या होत्या. चंद्रो तोमर यांच्या मृत्यूनंतर दोघींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलं. 

भूमीने चंद्रो तोमर यांच्यासोबत फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, 'चंद्रो तोमर यांच्या जाण्याने मला फार दुःख झालं आहे. माझ्यातला एक भाग निघून गेला असं मला वाटतं आहे. त्यांनी स्वतःचे नियम तयार केले आणि अन्य मुलींनाही जीवनाचं महत्त्व शिकवलं आणि धैर्य दिलं.' असं लिहिलं आहे. 

चित्रपटात तापसी पन्नूने प्रकाशी तोमर यांची व्यक्तीरेखा साकारली. तापसीने देखील चंद्रो तोमर यांच्यासोबत फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, 'तुम्ही प्रेरणा आहात आणि नेहमीच असाल. ज्या मुलींना तुम्ही जगण्याचं महत्त्व समजावलं त्यांच्यासाठी तुम्ही कायम जिवंत आहात.' असं म्हणत तापसीने त्यांना माझी क्यूट रॉकस्टार असं देखील लिहिलं आहे.