खाली डोकं वर पाय; अभिनेत्रीची का झाली अशी अवस्था?

या प्रसिद्ध अभिनेत्रीचे अनेकदा व्हिडिओ व्हायरल होत असतात.

Updated: May 4, 2022, 06:31 PM IST
खाली डोकं वर पाय; अभिनेत्रीची का झाली अशी अवस्था? title=

मुंबई : प्रसिद्ध अमेरिकन गायिका केटी पेरी तिच्या वॉर्डरोब मालफंक्शनमुळे चर्चेत आहे. पुन्हा एकदा केटी चर्चेत आली आहे. मात्र यावेळी तिचा व्हिडीओ खुर्चीवरून पडल्यामुळे व्हायरल होत आहे. केटीचा हा व्हिडिओ अमेरिकन आयडॉलच्या सेटचा आहे जिथे ती बसलेली असताना खुर्चीवरून पडते. केटीने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवरही शेअर केला आहे.

अमेरिकन आयडॉलच्या या एपिसोडमध्ये केटीने मर्मेडचा गेटअप केल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. ती फिश शेप गेटअप लूकमध्ये खुर्चीवर बसलेली दिसत आहे... येथे शोचे होस्ट टॉप 10 स्पर्धकांबद्दल बोलत आहे. त्यानंतर जजच्या पॅनेलमध्ये बसलेली केटी तिच्या खुर्चीवरून खाली पडते. तिला पाहून जज तिच्याकडे धावत जातात.

केटीने स्वतःचीच उडवली खिल्ली
खुर्चीवरून पडल्यानंतर केटीसोबत बसलेले जज तिला संभाळताना आणि उचलण्याचा प्रयत्न करतात. केटी आणि तिच्या सह-जजने हा प्रेरणादायी क्षण हसवून मजेदार बनवला आहे. तिच्या पडण्याच्या घटनेवर केटी स्वतः हसते. जज... तिला वर खेचतात आणि उचलूनआपल्या मांडीत घेतात आणि तिला पुन्हा खुर्चीवर बसवतात. खचाखच ऑडियन्सने भरलेल्या शोमध्ये केटीसोबत ही घटना घडली. त्यानंतर संपूर्ण सेटवरचे सगळे लोकं हसू लागले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

स्वतःला लाज वाटेल असं होण्यापासून कसं वाचवायचं, हे कोणीतरी केटीकडून शिकलं पाहिजे. याआधीही शोमध्ये तिची पँट फाटली होती. पण केटीने... या ऊप्स मोमेंटला हलकंच घेतलं आणि स्पॉट बॉयकडून टेप घेऊन तिने चिकटवली. आणि अशाच कपड्यात संपूर्ण शोमध्ये दिसली. तिचा हा मजेशीर व्हिडिओ... खूप व्हायरल झाला होता.