जेव्हा आपल्याच सिनेमाचा डान्स विसरले सारा-रणवीर : व्हिडिओ

सोशल मीडियावर ट्रोल 

Updated: Dec 10, 2019, 09:56 AM IST
जेव्हा आपल्याच सिनेमाचा डान्स विसरले सारा-रणवीर : व्हिडिओ  title=

मुंबई : सैफ अली खानची मुलगी सारा आणि रणवीर सिंह रविवारी एका स्टार स्क्रीन अवॉर्ड सोहळ्यात दिले. या दरम्यान काही लोकांनी सारा आणि रणवीरला डान्स करण्याची मागणी केली. दोघांनीही डान्स करण्याची तयारी दर्शवली. 

सारा आणि रणवीरने 'सिम्बा' सिनेमातील 'लडकी आंख मारे' या गाण्यावर डान्स केला आहे. डान्स करता करता दोघंपण मध्येच डान्स स्टेप्स विसरून गेले. रणवीर नीट डान्स करू शकला नाही म्हणून सारा बराचवेळ हसतच राहिली. सोशल मीडियावर त्यांच्या या चित्रविचित्र डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला. 

अगदी कमी वेळात हा व्हिडिओ 2 लाखहून अधिक लोकांनी पाहिला. यानंतर हे दोघेपण सोशल मीडियावर ट्रोल झाले. 'लडकी आंख मारे' हे गाणं सिम्बा सिनेमातील असून या गाण्यातील खूप पसंती मिळाली होती. त्यामुळे लोकप्रिय गाण्याच्या स्टेप्स विसरल्यामुळे दोघांना ट्विटरवर ट्रोल करण्यात आलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#RanveerSingh #SaraAliKhan

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

गोरेगावच्या फिल्म सिटीमध्ये स्टार स्क्रीन अवॉर्ड सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रणवीर सिंहच्या आणि सारा अली खानच्या लूक्सची जोरदार चर्चा रंगली. साराने रेड कार्पेटवर ट्यूब वन पीस ड्रेससोबत हाय हील्स कॅरी केल्या होत्या. सारा या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस दिसत होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#SaraAliKhan #RanveerSingh #ShahidKapoor Fun Times at the #StarScreenAwards red carpet #ManavManglani

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

सारा - रणवीरसोबत मस्ती करण्यासाठी अभिनेता शाहिद कपूर देखील जॉईन झाला. या तिघांचा मस्तीचा मूड कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तर रणवीर आणि साराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्टार स्क्रीन अवॉर्ड 2019 मध्ये रणवीर सिंहला 'गली बॉय' सिनेमाकरता लोकप्रिय अभिनेताचा पुरस्कार मिळाला आहे. तर सारा अली खानचा 'केदारनाथ' सिनेमाकरता बेस्ट न्यूकमर अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.