Priyanka च्या घरी Shahid Kapoor टॉवेलवर दिसताच उडाला एकच गोंधळ...

एक काळ असा होता जेव्हा प्रियांका चोप्रा आणि शाहिद कपूर एकमेकांच्या प्रेमात पुरते बुडाले होते.

Updated: Nov 8, 2021, 03:18 PM IST
Priyanka च्या घरी Shahid Kapoor टॉवेलवर दिसताच उडाला एकच गोंधळ... title=

मुंबई : बॉलीवूडमध्ये रोज नवनवीन जोडी तयार होत असतात आणि हे जोडप्यांचं समीकरण बदलत देखील असतं, त्यांच्यामध्ये लव ट्रँगल आला की, मग या सेलिब्रिटींच आपल्या पार्टनरसोबतचं नातं बदलतं. अशी अनेक जोडप्यांची नावं आपल्यासमोर आली आहेत. त्यात अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांची जोडी देखील नावाजलेल्या प्रेमी जोडपींपैकी एक आहे.

या दोघांनीही आपापल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. शाहिद आणि प्रियांकाची जोडीही लोकांना आवडली आहे. दोघांनी मोठ्या पडद्यावर एकत्र काम केले आहे. रील लाइफनंतर खऱ्या आयुष्यातही त्यांच्या चाहत्यांनी दोघांच्या जोडीला पसंती दर्शवली.

एक काळ असा होता जेव्हा प्रियांका चोप्रा आणि शाहिद कपूर एकमेकांच्या प्रेमात पुरते बुडाले होते. दोघांच्या अफेअरच्या बातम्याही खूप गाजल्या होत्या. त्यादरम्यान प्रियांका आणि शाहिदच्या नात्यासंदर्भात एक अशी बातमी समोरी आली आहे, ज्यामुळे सर्वत्र चर्चा सुरू आहे.

ही बातमी तशी जूनी आहे, परंतु त्याची चर्चा अजूनही लोकं करत आहेत. जेव्हा आयकर अधिकारी प्रियांकाच्या घरी पोहोचले तेव्हा शाहीदनेच दरवाजा उघडला होता, हे तस सगळ्यांना जवळ जवळ ठाऊकच आहे, परंतु त्यासंदर्भात आणखी एक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे जेव्हा शाहिदने दरवाजा उघडला तेव्हा तो फक्त टॉवेलवरती होता. त्यावेळी प्रियंकाच्या घरी शाहिदला पाहिले गेले ज्यामुळे हे दोन्ही जोडपे एकमेकांना डेट करत आहेत यावर शिक्कामोर्तब झाला.

जानेवारी 2011 मध्ये एकदा आयकर अधिकारी प्रियंका चोप्राच्या घरी पोहोचले होते. यावेळी शाहिद कपूरने अभिनेत्रीच्या घराचा दरवाजा उघडला होता, असे सांगितले जाते की, त्यावेळेस शाहिद टॉवेलवर होता. तो अंगाभवती टॉवेल गुंडाळून दार उघडायला आला होता.

रिपोर्ट्सनुसार, या घटनेनंतर दोघांना अनेकदा एकत्र पाहिले गेले. परंतु त्यांचे हे गोड नातं जास्त काळ टिकले नाही, ज्यामुळे काही काळानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. आता दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. प्रियांका चोप्राने निक जोनासशी तर शाहिदने मीरा राजपूतशी लग्न केले.