धक्कादायक! नरगिस यांना कोणत्या कारणामुळे वाटलं संजय दत्त आहे 'गे'?

स्वतः संजय दत्त याच्या बहिणीने केला खुलासा 

Updated: Apr 18, 2020, 02:52 PM IST
धक्कादायक! नरगिस यांना कोणत्या कारणामुळे वाटलं संजय दत्त आहे 'गे'? title=

मुंबई : बॉलिवूडचा 'मुन्ना भाई' संजय दत्त यांच नातं कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं आहे. आपल्या आयुष्यात नाव आणि पैसा कमावून जिथे संजय दत्त लोकप्रिय झाला तिथेच त्याचं आयुष्य अनेक वादांनी घेरलेलं आहे. संजय दत्त यांच आयुष्य अगदी रोलरकोस्टर प्रमाणे आहे. त्याच ड्रग्स घेणं, शस्त्र बाळगणं यामुळे त्याची बॅड इमेज आहे. पण आई नरगिससोबत असलेलं नातं पाहत त्याच्यातील निरागसपणा देखील समोर आला आहे. 

आई नरगिसच्या अगदी जवळ होता संजय दत्त. नरगिस देखील संजय दत्तवर प्रचंड प्रेम करत होत्या. मात्र एकवेळ अशी आली की, संजय दत्त गे तर नाही ना. काय आहे हा किस्सा, जाणून घ्या

आपल्या सगळ्यांना माहितच आहे की, नरगिस दत्त या आपल्या तीन मुलांच्या संगोपनासाठी सिनेसृष्टीपासून दूर राहिल्या. असं कायम म्हटलं जातं की, तीन मुलांपैकी संजय दत्तच नरगिस यांच्या अगदी जवळचा होता. संजयची बहिण नम्रता दत्त (Namrata Dutt) यांनी संजयच्या बायोग्राफीत खूप मोठा खुलासा केला होता. नरगिस यांना संजय दत्त गे असल्याचा संशय आला होता. 

या पुस्तकात नम्रता दत्त यांनी लिहिलं होतं की, नरगिस यांना एकदा प्रश्न पडला होता की, संजय दत्त आपल्या मित्रांसोबत बंद खोलीत नेमकं काय करतो? काही तरी नेमकं आहे? आशा असेल की, तो गे नाही. बायोपिकमध्ये प्रिया दत्त यांनी खुलासा केला होता की, नरगिस संजय दत्त यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवत असतं. संजय दत्त ड्रग्स घेत होता. पण नरगिस यांना कधीच या गोष्टीवर विश्वास बसला नाही. त्या म्हणत, संजय दत्त कधीच ड्रिंक्स घेत नाही तर ड्रग्सला त्याने कधीच स्पर्शही केला नाही.