मुंबई : मराठी अभिनेत्री मानसी नाईक (Mansi Naik) ही तिच्या उत्तम नृत्यशैलीसाठी ओळखली जाते. मानसीचं ‘बघतोय रिक्षावाला’ (Baghtoy Rikshawala), ‘बाई वाड्यावर’ ही गाणी चांगलीच लोकप्रिय झाली होती. खरंतर या गाण्यांमुळे मानसीला घराघरात ओळख मिळाली. मानसी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत मानसी चाहत्यांच्या संपर्कात राहते. काही दिवसांपूर्वी मानसी आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. (Mansi Naik Husband Pradeep Kharera) दरम्यान, घटस्फोटाच्या चर्चेत मानसीनं सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
मानसीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यात म्हटलं आहे की, ''आपल्या आयुष्यात अनेक मित्र येतात जे तुमच्यासाठी सतत खंबीरपणे उभे राहत असतात. तुम्ही जे जसे आहात, तसे ते तुम्हाला स्वीकारतात आणि त्याबद्दल त्यांच्या मनात तुमच्याविषयीच आदरच असतो. ते तुमच्यासाठी लढतात. तुम्हाला सहभागी करुन घेतात. तुम्हाला प्रोत्साहन देतात. काहीही झालं तरी ते तुमच्यासाठी खंबीरपणे उभे राहतात.
पण माझ्या आयुष्यात अशी काही माणसं अपवादाने आली की ज्यांनी मित्राचा बुरखा घेतलेला होता मात्र त्यांनी वरीलपैकी कोणतीही गोष्ट केली नाही. माझ्या या कठीण काळात माझ्या वैयक्तिक आयुष्याच्या संदर्भातील माहितीचा कोणी गैरउपयोग करत असेल तर कृपया त्या खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नका आणि त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. ही विनंती सर्वांसाठी आणि प्रसारमाध्यमांसाठी आहे''
मानसीने ही शेअर केलेली स्टोरी पाहून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसत आहे कारण तिने शेअर केलेल्या या इन्स्टाग्राम स्टोरीचे तिच्या खासगी आयुष्याशी आणि घटस्फोटाशी संबंध जोडला जात आहे. मात्र अद्याप तिने यावर काहीही स्पष्ट वक्तव्य केलेलं नाही. ही पोस्ट शेअर करताच ही स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मानसी आणि प्रदीप 19 जानेवारी 2021 रोजी लग्नबंधनात अडकले होते. मानसीचा पती प्रदीप खरेरा हा एक बॉक्सर आणि मॉडेल (Mansi Naik Husband Profession)आहे. बरीच वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी सप्तपदी घेण्याचा निर्णय घेतला होता. नेहमीच पतीसोबत फोटो शेअर करणारी मानसी गेल्या काही दिवसांपासून प्रदीपसोबतचे फोटो शेअर करत नसल्याचं काही नेटकऱ्यांच्या लक्षात आलं.
फक्त मानसी नाही तर तिचा पती प्रदीप देखील नेहमीच मानसीसोबत फोटो शेअर करायचा. (Mansi Naik Husband Is Boxer and Model)आता त्याच्या अकाऊंटवरही मानसीचे फोटो दिसत नाही असं म्हणत काही नेटकऱ्यांनी ती विभक्त झाले का किंवा त्यांच्यात दुरावा आला का असा प्रश्न केला आहे. दरम्यान, त्या दोघांनी या बातमीला दुजोरा दिलेला नाही. .