आर्या आंबेकरसोबत घडला धक्कादायक प्रकार; व्हिडीओ जारी करून दिला इशारा

अभिनेत्री आणि गायिका आर्या आंबेकर ही झी माराठी वाहिनीवरी 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या शोमधून घरा-घरात पोहचली. प्रिटी यंग गर्ल या नावेने तिला सारेगमपमध्ये ओळखलं जायचं. यानंतर आर्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

Updated: Dec 12, 2023, 01:34 PM IST
आर्या आंबेकरसोबत घडला धक्कादायक प्रकार; व्हिडीओ जारी करून दिला इशारा title=

मुंबई : अभिनेत्री आणि गायिका आर्या आंबेकर ही झी माराठी वाहिनीवरी 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या शोमधून घरा-घरात पोहचली. प्रिटी यंग गर्ल या नावेने तिला सारेगमपमध्ये ओळखलं जायचं. यानंतर आर्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आजपर्यंत आर्याने अनेक मालिकांना सिनेमातील गाण्यांना आवाज दिला. याचबरोबर आर्याने ती सध्या काय करते या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. या सिनेमातून ती घरा-घरात पोहचली. जसं तिच्या गाण्याचं कौतुक होतं तसंच तिच्या अभिनयाचंही कौतुक झालं. तिला गुणी कलाकार म्हणूनही ओळखलं जातं. मात्र आता आर्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

आर्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट शेअर केला आहे. या व्हिडीओ तिने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकाराबद्दल सांगितलं आहे. आर्यासोबत एक मोठा स्कॅम झाला आहे. याच संदर्भात आर्याने एक पोस्ट शेअर केली आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की,'' New scam in the market..beware musicians..

मी माझ्या live concerts मध्ये गायलेल्या काही गाण्यांचे videos काही लोकांनी YouTube वर पोस्ट केले होते. त्या videos मधून audios extract करून "latest Marathi Kirtan" नावाच्या एका music label ने audio platforms वर स्वतःच्या copyright सकट upload केले. हे audios (videos देखिल!) माझ्या परवानगी शिवाय upload झालेले आहेत. पण त्यावर claim करता येण्यासाठी original व्हिडिओ किंवा ऑडियो माझा स्वतःचा असायला हवा. तो नसल्यामुळे, माझा आवाज माझ्या परवानगी शिवाय वापरला असूनही मला claim करता येत नाहीये! How sad can this get!''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याचबरोबर आर्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शेअकर करत तिच्यासारख्या इतर गायकांना व संगीतकारांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. आर्याने गायलेली गाणी आणि youtube चॅनेल ने त्यांच्या अकाउंट वर शेअर केली आहे. आपल्या परवानगी शिवाय हे युट्युब वर असे कसे करू शकतात असे म्हणत आर्याने संताप व्यक्त केला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  तर एका चाहत्याने एक कमेंट करत लिहीलं आहे की, आर्या हेच तुला मी ६ ते ८. महिन्यांपूर्वी मेसेज केला होता पण तु  बघितल नाहीसं.  प्रोफाईल तुझी होती म्हणून मी मेसेज करत होते नंतर तिने मला सांगितलं मी आर्या आंबेकर नाही. मी त्यांना ओळखत पण नाही मी तुला केलेले सगळे मॅसेज त्याला जात होते मग मी त्यांचं अकाउंट ब्लॉक आणि डिलिट केलं.  काळजी घे.