मुंबई : शाहरूख खानचा 'मोहब्बते' हा सिनेमा आठवतोय. या सिनेमात 3 जोड्या होत्या. त्यातील किम शर्मा ही अभिनेत्री आठवतेय का? या अभिनेत्रीला दोन - तीन सिनेमे मिळ्यालानंतर पुढे काम मिळणं कठीण झाल. आणि मग ही अभिनेत्री बॉलिवूडमधून गायब झाली. मात्र आता एका हटके कारणामुळे ही अभिनेत्री चर्चेत आली आहे. हे कारण वाचून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल.
किमने आपल्या बाईला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे बऱ्याच कालावधीनंतर कीम चर्चेत आली आहे. हा घटना मे महिन्यात घडला आहे. एस्थर खेस असं नाव असलेल्या या महिलेला मारहाण केली आहे. एस्थरने केलेल्या तक्रारीत सांगितलं आहे की, एस्थर दोन महिने किमच्या घरी काम करत होती. कपडे धुताना ही बाई सफेद आणि रंगीत कपड्यांना वेगवेगळं करत असे. असं असूनही कपडे धुतल्यावर माझ्या लक्षात आलं की काळ्या ब्लाऊजचा रंग सफेद टिशर्टला लागला होता. मला माझी चूक लक्षात आली असून मी किमला त्याबाबत सांगितलं. हे ऐकून किमला भरपूर राग आला आणि ती माझ्यावर ओरडू लागली.
तिने मला धक्का मारून घराबाहेर काढलं आणि पुन्हा घरी न येण्याचा सल्ला दिला. तसेच तिने मला पुन्हा घरी कधीच येऊ नको असं सांगून घरा बाहेर काढलं. तसेच माझ्याशी खूप चुकीच्या भाषेत बोलली. एवढंच नाही तर मला पगार देखील न देण्याच सांगितलं. एस्थरने अनेकदा किमकडे पैसे मागितले मात्र तिने धक्कामारत तिला बाहेर काढलं यानंतर 27 जुलै रोजी एस्थरने पोलिसांत तक्रार दाखल केली. खार पोलिसांनी किमला समन पाठवला आणि तिला अलर्ट केलं आहे. तक्रार दाखल करणारी एस्थर न्यायालयात देखील दाद मागू शकते. किमचं म्हणणं आहे की, दर महिन्याच्या 7 तारखेला किमला सॅलरी दिली जात होती. एस्थरला 7 तारखेला सर्व पैसे दिले होते. तसेच मी एस्थरला मारलं देखील नाही. तिने माझे 70 हजार रुपयाचे कपडे खराब केले आहेत. मी फक्त तिला घरातून जाण्यास सांगितले.