अचानक वेगळं होत 'या' सेलिब्रिटी जोड्यांनी दिला धक्का

काही तर 18 वर्षांचं नातं विसरले

Updated: Oct 13, 2019, 04:04 PM IST
 अचानक वेगळं होत 'या' सेलिब्रिटी जोड्यांनी दिला धक्का  title=

मुंबई : बॉलिवूडमधील कलाकारांची नावं एकमेकांसोबत जोडली जाणं हे काही नवीन नाही. अगदी तसंच एकमेकांपासून अनेक वर्षांच नातं विसरून वेगळं होणं हे देखील चाहत्यांना काही नवीन नाही. पण जेव्हा परफेक्ट कपल म्हणून ओळखले जाणारे कलाकार एकमेकांपासून लांब होतात तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसतो. अशाच काही जोड्यांबाबत... 

Image result for hrutik suzan  zee news

हृतिक रोशन - सुझैन खान 

20 डिसेंबर 2000 रोजी हृतिक रोशन-सुझैन खानने लग्न केलं होतं. मात्र 2014 मध्ये म्हणजे तब्बल 14 वर्षांनी या दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या नात्यात दरी निर्माण झाल्याच्या गोष्टी समोर येत होते. कुणी विचार केला नव्हता की, या दोघांच्या बाबतीत असं घडेल. मात्र अजूनही हे दोघं एकमेकांसोबत दिसतात. 

Image result for dia mirza sahil sangha zee news

दीया मिर्झा-साहिल सांघा 

दीया मिर्झा आणि साहिल सांघा यांनी 2014 मध्ये लग्न केलं. मात्र ऑगस्टमध्ये या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. दीयाने स्वतः इंस्टाग्रामवर याबाबत सांगितलं. 11 वर्ष एकत्र राहिल्यानंतर, अनेक गोष्टी एकत्र शेअर केल्यानंतर आम्ही सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय़ घेतला आहे. आम्ही मित्र आहोत त्यामुळे यापुढे एकमेकांचा सन्मान करू. 

Image result for arora arbaz   zee news

मलायका अरोरा-अरबाज खान 

मलायका आणि अरबाज खान यांच लग्न 12 डिसेंबर 1998 मध्ये झालं. 11 मे 2017 रोजी या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या तब्बल 18 वर्षे आणि 5 महिन्यांनी या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतलं. या दोघांना मुलगा आहे. अरबाज लग्नानंतर जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे. तर मलायका अरोरा अर्जून कपूरला डेट करत आहे. 

Image result for shahid kareena  zee news

शाहिद कपूर-करिना कपूर 

एक वेळ अशी होती जेव्हा शाहिद-करिना हे नाव एकत्र लिहिलं जात असे. हे दोघं फक्त ऑनस्क्रीनच नाही तर ऑफस्क्रीन देखील एकत्र फिरताना दिसले. मात्र या दोघांमध्ये असं काही खटकलं की, काही वर्षांनी करीनाने सैफ अली खानसोबत लग्न केलं. तर शाहिद कपूरने मीरा राजपूतसोबत लग्न केलं. 

Image result for bipasha basu john abraham zee news

जॉन अब्राहम - बिपाशा बसू 

जॉन अब्राहम - बिपाशा बसू खूप दिवस डेट करत होते. मात्र अचानक हे दोघे वेगळे झाले. ज्यानंतर जॉनने 2014 साली प्रिया रुंचलसोबत लग्न केलं. हे लग्न अगदी गुपचूपपद्धतीने झालं. तर बिपाशाने करण सिंह ग्रोवरसोबत लग्न केलं.