विश्वासाच्या माणसांनीच.... आमिरच्या मुलीसोबत जे घडायचं नव्हतं ते घडलं आणि...

आमिरची मुलगी, आयरा हिला वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी भीषण प्रसंगाचा सामना करावा लागला होता. 

Updated: Feb 14, 2022, 11:39 AM IST
विश्वासाच्या माणसांनीच.... आमिरच्या मुलीसोबत जे घडायचं नव्हतं ते घडलं आणि...  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूडमधील काही दमदार अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अभिनेता आमिर खान. आमिरच्या नावावरच चित्रपट यशस्वी होतात, असं म्हटलं तर त्यामध्ये काही वावगं ठरणार नाही. पण, तुम्हाला माहितीये का रुपेरी पडद्यावर आमिरचं आयुष्य जितकं सुरेख वाटतं, तितकीच गुंतागुंत त्याच्या खऱ्या आयुष्यात आहे. (aamir khan daughter)

वैवाहिक आयुष्यात असणाऱ्या काही अडचणींमुळेही आमिरच्या नावाच्या बऱ्याच चर्चा झाल्या. ज्यानंतर त्यांच्या मुलीनंही तिच्या आयुष्यातील अशा गोष्टींचा उलगडा केला, ज्यामुळं प्रचंड खळबळ माजली. 

आमिरची मुलगी, आयरा हिला वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी भीषण प्रसंगाचा सामना करावा लागला होता. 

नैराश्याचा सामना केला आणि... 
आमिर सोशल मीडियावर सक्रिय नसला, तरीही त्याची मुलगी इरा मात्र सोशल मीडिया गाजवत असते. आयरानं खासगी आयुष्यात काही असे दिवसही पाहिले ज्यामध्ये तिचं मानसिक आरोग्यही पणाला लागलं होतं. 

पण, आपल्या नैराश्यावर आणि मानसिक अवस्थेवर आयरा कायम खुलेपणानं बोलली. आपल्याला यामध्ये डॉक्टरांचीही मदत लागल्याचं तिनं स्पष्ट केलं होतं. 

14 व्या वर्षी असं काही घडलं की.... 
आपल्यावर ओढावलेल्या परिस्थितीतून आयरा सध्या बाहेर येऊ पाहत आहे. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी आयरावर ओळखीच्या व्यक्तीनं लैंगिक अत्याचार केले होते. 

विश्वासार्ह व्यक्तीमुळेच आरासोबत जे घडायचं नव्हतं, ते घडलं... 

आपल्यासोबत काय घडतंय हे तिला त्यावेळी कळलं नव्हतं. पण, समोरच्या व्यक्तीला चांगलंच माहित होतं की तो काय करत होता... खुद्द आयरानं याबाबतचा खुलासा केला होता. 

आपल्यासोबत नेमकं काय सुरु आहे, हे कळण्यासाठी तिला 1 वर्ष लागलं होतं. ज्यानंतर तिनं लगेचच आई-वडिलांना आपल्यासोबत जे घडलं ते सांगितलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

आई- वडिलांच्या मदतीने आयरा या प्रसंगातून बाहेर आली. पण, आपण स्वत:सोबत हे सर्व कसं घडून दिलं या विचारानेच आयराचा संताप अनेकदा अनावर होतो. 

एक स्टारकिड असूनही आपण ज्या परिस्थितीतून पुढे आलो ती किती भीषण होती, याची माहिती आयरानं सर्वांनाच दिली. 

आपल्यासोबत घडणाऱ्या गोष्टींबद्दल कायम विश्वासार्ह माणसांशी बोलावं हे तिच्या या वागण्यातून स्पष्ट झालं.