श्रीराम मांसाहार करण्याच्या डायलॉगमुळे नयनताराच्या 'अन्नपूर्णानी' चित्रपटाविरोधात तक्रार

Nayanthara's Annapoorani movie :  नयनताराचा ‘अन्‍नपूर्णी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील श्रीराम यांनी मांसाहार केला असा उल्लेख आहे. त्यावरून आता मोठा वाद सुरु झाला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jan 8, 2024, 03:30 PM IST
श्रीराम मांसाहार करण्याच्या डायलॉगमुळे नयनताराच्या 'अन्नपूर्णानी' चित्रपटाविरोधात तक्रार title=
(Photo Credit : Social Media)

Nayanthara's Annapoorani movie : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लेडी सुपरस्टार म्हणून नयनतारा ओळखली जाते. नयनतारा ही सध्या ‘अन्‍नपूर्णी’ या चित्रपटात दिसत आहे. तिच्या या चित्रपटातून हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या आहेत, असा आरोप करण्यात आला आहे. शिवसेना नेते रमेश सोलंकी यांनी निर्मात्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्या तक्रारित ते म्हणाले आहेत की हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या आहेत. निर्मात्यांनी श्रीराम यांचा अपमान केला आहे. इतकंच नाही तर त्यांनी या चित्रपटाला हिंदू धर्मा विरोधी असल्याचं म्हटलं आहे आणि चित्रपटातील काही सीन्सवर निशाणा साधला आहे. त्यातील एक सीन आहे ज्यात श्रीराम यांनी मांसाहार केला असा उल्लेख आहे. तर हा चित्रपट अॅन्टी हिंदू असल्याचं म्हटलं आहे. 

रमेश सोलंकी यांनी त्यांच्या X म्हणजेच ट्विटर अकाऊंटवरून हा दावा केला आहे की नयनमताराच्या ‘अन्‍नपूर्णी’ चित्रपटात लव जिहादचं समर्थन करण्यात आलं आहे. त्यांनी मुंबई पोलिस आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडनवीस यांना निवेदन केलं आहे की त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी आणि चित्रपट निर्माते आणि ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स विरोधात तक्रार दाखल करा. 

पुढे X अकाऊंटवर रमेश सोलंकी यांनी लिहिले की 'या वेळी, जिथे संपूर्ण जग हे श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या आनंदाला साजरा करत आहे. तिथे, नेटफ्लिक्सवर, झी स्टूडियो, नाद स्टूडिओ आणि ट्रिडेंट आर्ट्सचे निर्माते अॅन्टी- हिंदू चित्रपट ‘अन्‍नपूर्णी’ प्रदर्शित झाला आहे. पहिली गोष्ट हिंदू पुजाऱ्याची मुलगी बिर्याणी खाताना दिसते. दुसरी गोष्ट म्हणजे या चित्रपटात लव जिहादला प्रमोट करण्यात आलं आहे. तिसरी गोष्ट फरहान या चित्रपटात अभिनेत्रीला मांसाहार करण्यास प्रोत्साहन करत आहे. तो म्हणतोय की श्रीराम हे मांसाहार करायचे.'

हेही वाचा : VIDEO : लेकीच्या लग्नात नाचला आमिर खान, Ex-Wife किरण रावनं दिली साथ तर रीना दत्ता...

रमेश सोलंकी यांनी त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीचा फोटो देखील शेअर केला आहे. त्याशिवाय त्यात त्यांनी नेटफ्लिक्स आणि झी स्टूडियोला टॅग केलं आणि म्हणाले की त्यांनी मुद्दामून हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासोबत त्यांनी सरकार आणि पोलिसांना देखील टॅग केलं आहे. या सगळ्यांविरोधात हिंदूंच्या भावना दुखावल्यामुळे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.