Shivaji Satam Emotional Post : 'सीआयडी' या लोकप्रिय क्राईम थ्रिलर शोमध्ये 'फ्रेड्रिक्स'ची भूमिका साकारणारे अभिनेते दिनेश फडणीस (Dinesh Phadnis) यांचं वयाच्या 57 व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील तुंगा रुग्णालयात दिनेश फडणीस यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, सर्वांना हसावणाऱ्या लाडक्या फ्रेडीने अखेरचा श्वास घेतला (Dinesh Phadnis passed away) आहे. काल रात्री म्हणजेच 4 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजता त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. तर त्यांच्या पार्थीवावर 5 डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार होणार आहे. अशातच फ्रेडरिक्स गेल्याची माहिती समजताच शिवाजी साटम (Shivaji Satam) यांना अश्रू अनावर झाले. त्यानंतर त्यांनी एक भावूक पोस्ट केली आहे.
दिनेश फडणीस हे लिव्हर डॅमेजच्या समस्येनं त्रस्त होते. दिनेश यांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं. अखेर दोन दिवस त्यांची मृत्यूशी चाललेली झुंज थांबली. त्यांच्या कुटुंबीयांसह सीआयडी टीमचे सदस्य देखील रुग्णालयात दाखल झाले होते. त्यावेळी, दिनेश आजारी होता. पण तो असा अचानक जाईल असं वाटलं नव्हतं. दिनेश माझा सहकलाकार कमी आणि कुटुंबातला सदस्य जास्त होता. त्याचं हे अचानक जाणं खूप व्यथित करणारं आहे, अशी प्रतिक्रिया शिवाजी साटम यांनी दिली होती. तर साधा, प्रेमळ आणि नम्र, अशा तीन शब्दात शिवाजी साटम यांनी (Shivaji Satam On Dinesh Phadnis Death) पोस्ट केली आहे.
सर्वात लोकप्रिय रहस्यमय कथानकं असलेला सीआयडी हा शो लहान मुलांमध्येच नाही तर मोठ्यांमध्ये देखील प्रसिद्ध होता. 'सीआयडी' या मालिकेच्या माध्यमातून अभिनेते दिनेश फडणीस घराघरांत पोहोचले आहेत. दिनेश यांनी 1993 मध्ये 'फासले' या शोच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्याचबरोबर 'सरफरोश' आणि 'सुपर 30' या सिनेमात देखील त्यांनी काम केलंय. तारक मेहता का उल्टा चष्मा , सीआयडी : विशेष ब्यूरो, अदालत, सीआयएफ या मालिकेत देखील त्यांनी काम केलं आहे. दिनेश यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहेत.
दरम्यान, दिनेश फडणीस यांच्या अशा अचानक जाण्यानं चाहत्यांना धक्का बसला आहे. तुझी आठवण येईल मित्रा. तू जाण्याची घाई केलीस. देव तुला त्यांच्या चरणी स्थान देवो. ओम शांती. तुझ्या आत्म्याला शांती लाभो.. तुझ्या आठवणींवर आम्ही जगू, अशी भावूक पोस्ट डॉ. साळुंखे यांची भूमिका करणारे नरेंद्र गुप्ता यांनी केली आहे.
याद आओगे, याद रहोगे हमेशा दोस्त । जल्दी कर दी न जाने में यार ।। प्रभु तुम्हें अपने श्री चरणों में स्थान दे । शांति ।।
Rest in peace my dear friend Dinesh Phadnis ,May your soul rest in peace.. हम तुम्हारी यादों के साथ रहेंगे pic.twitter.com/Le4F1TdfU9— Narendra Gupta (@Narendragupt) December 5, 2023