''हो तो कागद मी गिळला'', मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची कबुली

शिवसेना महापौर किशोरी पेडणेकर यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Updated: Apr 4, 2022, 08:23 PM IST
''हो तो कागद मी गिळला'', मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची कबुली title=

मुंबई : शिवसेना महापौर किशोरी पेडणेकर यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडिमध्ये त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामध्ये त्या बोलताना दिसत आहे की, हो, तो कागद मी कुणाच्या हाताला लागू नये म्हणून गिळला'' 

नेमकं प्रकरण काय?
नुकत्याच पार पडलेल्या 'किचन कल्लाकार' या कार्यक्रमात किशोरी पेडणेकर यांनी हजेरी लावली होती. यावेळी किशोरी ताईंनी ही जाहिर कबुली दिली. या व्हिडिओच्या सुरुवातीला संकर्षण कऱ्हाडे किशोरी पेडणेकर यांना म्हणतो, तुमच्यासाठी आम्ही एक सप्राईज प्लान केला आहे. यानंतर या  मंचावर त्यांचे पती सरप्राईज एंट्री घेतात. हे पाहून किशोरी ताईंना खूप आनंद होतो. यानंतर किशोरी ताई म्हणतात की, लव्हमॅरेजपासूनची ही वर्ष आणि याच्यानंतरची ती वर्षम्हणजे माझं हे मोठं सरप्राईज. यानंतर त्या म्हणतात की, मी पिठ मळत असताना आमचा जो मध्यस्थी करणारा होता. तो एक चिठ्ठी घेवून आला. आणि देता-देता ती खाली पडली आणि मी पिठ मळत होते. आणि माझे सगळे भाऊ समोर बसले होते. त्यातल्या एकाने हे पाहिलं. की, काहितरी त्याने दिलयं. तो विचारला येणार ईतक्यात मी ती चिठ्ठी खाऊन टाकली. 

या व्हिडिओनंतर हे स्पष्ट होतं की, हा कागद म्हणजे एक लव्हलेटर आहे.  हा धमाल किस्सा किशोरी ताईंनी झी मराठीच्या किचन कल्लाकार या कार्यक्रमात सांगितला आहे.  ही सगळी धमाल आपल्याला लवकरच  झी मराठीवरील किचन कल्लाकार या कार्यक्रमात पाहायला मिळेल.