मुलाला जन्म दिल्यानंतर Bharti Singh कडून नवीन पोस्ट शेअर, म्हणाली...

भारतीने पुन्हा एक पोस्ट शेअर केली आहे. जी इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

Updated: Apr 4, 2022, 07:22 PM IST
मुलाला जन्म दिल्यानंतर Bharti Singh कडून नवीन पोस्ट शेअर, म्हणाली... title=

मुंबई : कॉमेडियन भारती सिंग नुकतीच आई झाली आहे. तिने पती हर्ष लिंबाचियासोबत मुलाचे स्वागत केले आहे. 1 एप्रिलला भारती सिंगला मुलगी झाल्याची बातमी सोशल मीडियावर चर्चेत होती. ज्यानंतर भारतीने ही अफवा असल्याचे सांगत चर्चांना पूर्णविराम दिला होता. परंतु भारतीने आज म्हणजे 4 एप्रिलला एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. भारतीने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना आई बनल्याची माहिती दिली होती.

आता भारतीने पुन्हा एक पोस्ट शेअर केली आहे. जी इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

भारती सिंहने इन्स्टाग्राम अकाऊंटवर गरोदरपणातील फोटोशूटमधील एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा बेबी बंप दिसत आहे. भारती सिंग गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच क्यूट दिसत आहे, पण त्यापेक्षा जास्त तिने लिहिलेल्या कॅप्शनचीच जास्त चर्चा सुरू आहे. भारतीने टाकलेली ही पोस्ट खूपच मजेदार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कॉमेडियन भारती सिंहने फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जो पोटात होता तो आता बाहेर आला आहे. हा मुलगा आहे. लव्ह यू'  पुढे # मध्ये तिने गणपती बाप्पा मोरया. असं देखील लिहिलं आहे. भारतीच्या या पोस्टला खूप पसंती दिली जात आहे. आई झाल्याबद्दल चाहते तिचे अभिनंदन आणि शुभेच्छा देत आहेत.