फरहानसोबतच्या नात्याविषयी पहिल्यांदा बोलली शिबानी

काय म्हणाली शिबानी दांडेकर 

फरहानसोबतच्या नात्याविषयी पहिल्यांदा बोलली  शिबानी  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शिबानी दांडेकरसोबत चर्चेत आहे. या गोष्टीवर शिक्कामोर्तब तेव्हा झाला जेव्हा हे दोघं दीपवीरच्या रिसेप्शनला एकत्र पोहोचले. फरहानसोबत असलेल्या आपल्या नात्यावर शिबानी पहिल्यांदाच बोलली..

शिबानी दांडेकरने एका मुलाखती दरम्यान आपलं मतं सांगितलं. तिला असा प्रश्न विचारण्यात आला की, चाहत्यांचा दृष्टीकोन तुझ्या आयुष्यात किती महत्वाचा आहे. तेव्हा शिबानी म्हणाली की, हे व्यक्तीवर अवलंबून आहे. तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता. काही लोकं याने खूप प्रभावित होतात तर काहींना याची चिंताच नसते. 

पुढे शिबानी म्हणाली की, जेव्हा तुम्ही सार्वजनिक क्षेत्रात काम करता तेव्हा तुम्हाला ती समज असणे गरजेचं आहे. जग तुम्हाला बघत असतं याकरता तुम्हाला डील करावं लागतं. हे कधीच सोपं नसतं. 

शिबानी दांडेकरचं नाव 'नाम शबाना', 'भावेश जोशी' आणि 'सुल्तान' सारख्या सिनेमांशी जोडलं आहे. दीपवीरच्या रिसेप्शन अगोदर या दोघांनी दिल्लीच्या कॉफी डेमध्ये पाहिलं. तेव्हा फरहान आपल्या आगामी सिनेमाचं शुटिंग करत होता. 

फरहान प्रियंका चोप्रासोबत 'द स्काय इज पिंक' सिनेमाचं शुटिंग करत होता.  फरहानच्या पहिल्या पत्नीने अधूनाने 2016 मध्ये घटस्फोट घेतला.  फरहान आणि अधूनाची पहिली ओळख 1997 मध्ये जुहूच्या एका नाइट क्लबमध्ये धाली. 3 वर्षे डेट केल्यानंतर 2000 मध्ये वयाने 6 वर्षांनी मोठ्या असलेल्या अधूनासोबत फरहानने लग्न केलं. या दोघांना शाक्या आणि अकीरा अशा 2 मुली आहेत.