'जीत आपनी... दुश्मन की हार...' 'शेरशाह' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

पाहा ट्रेलर...

Updated: Jul 26, 2021, 11:01 AM IST
'जीत आपनी... दुश्मन की हार...' 'शेरशाह' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित title=

मंबई : बहुचर्चित चित्रपट 'शेरशाह'चा (Shershah) ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. देशभक्तीवर आधारलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर पाहाताचं तुमच्या  आंगावर शहारे येतील. 'शेरशाह' हा चित्रपट कारगिल युद्धात मोलाची कामगिरी पार पाडलेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या पराक्रमावर आधारित आहे. चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सध्य सर्वत्र फक्त आणि फक्त या  चित्रपटाची चर्चा आहे. 

चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani)मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कारगिल युद्धातील त्यांच्या धैर्यासाठी भारत सरकारने त्यांना परमवीर चक्राने सन्मानित केले. युद्धामध्ये त्यांचं कोडनेम 'शेरशाह' असं ठेवलं होतं. चित्रपट 12 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. 

सांगायचं झालं तर चित्रपटात विक्रम बत्रा यांची भूमिका साकारण्यासाठी सिद्धार्थने प्रचंड मेहनत घेतली आहे. ७ जुलै १९९९ रोजी पॉईंट ४८७५ याठिकाणी असलेल्या शत्रूच्या सैन्याला बत्रा यांनी ठार केले. मात्र त्याचवेळी भारतीय सेनेतील हा शूर योद्धाही शहीद झाला. ‘जय माता दी’ हे कॅप्टन बत्रा यांचे शेवटचे शब्द ठरले.