बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर शेहनाजला हवं तसं काही झालचं नाही, व्हिडिओ व्हायरल

सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाजचा व्हिडिओ व्हायरल; दुःख व्यक्त करत म्हणाली...

Updated: Sep 30, 2021, 09:55 AM IST
बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर शेहनाजला हवं तसं काही झालचं नाही, व्हिडिओ व्हायरल  title=

मुंबई : अभिनेत्री शेहनाज गिलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये शेहनाज भांडी घासताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये शेहनाज म्हणजे, 'बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर असं वाटलं की मला माझ्या लाखो चाहत्यांनी घेरलेलं असेल. माझे हात ऑटोग्राफ देवून थकून जातील, पण इथे तर माझे हात भांडी घासून थकले आहेत...' शेहनाजचा हा जुना व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. 

व्हिडिओमध्ये दिसत आहे की ती स्वतःचा संपूर्ण राग भांड्यांवर काढत आहे. शेहनाजच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेन्टचा वर्षाव होत आहे. शेहनाजचा हा व्हिडिओ लॉकडाऊन दरम्यानचा आहे. शेहनाजबद्दल सांगायचं झालं तर सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असणारी शेहनाज अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर पूर्णपणे कोलमडली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ती या धक्क्यातून स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. सिद्धार्थ आणि शेहनाजची ओळख पहिल्यांदा बिग बॉसच्या घरात झाली. बिग बॉसच्या घरातील त्यांची केमिस्ट्री प्रत्येकाला आवडली. सिद्धार्थ आणि शेहनाज लग्न करणार असल्याची देखील चर्चा होती. यामुळे शेहनाजला मोठा धक्का बसला आहे.