Sidharth Shukla Death : सिद्धार्थवर अंत्यसंस्कार होताच कोसळली Shehnaz Gill; पाहून होतंय काळजाचं पाणी....

निसर्गानंही आज अश्रूंना वाट मोकळी करुन दिली  

Updated: Sep 3, 2021, 09:55 PM IST
Sidharth Shukla Death : सिद्धार्थवर अंत्यसंस्कार होताच कोसळली Shehnaz Gill; पाहून होतंय काळजाचं पाणी.... title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : टेलिव्हिजन अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबईतील ओशिवरा येथील स्मशानभूमी येथे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सिद्धार्थचा मित्रपरिवार आणि कुटुंबीयांची उपस्थिती होती. 

सर्वत्र डोळ्यात पाणी आणणाचं चित्र पाहायला मिळालं. सिद्धार्थला निरोप देण्यासाठी आलेल्या प्रत्येकाची अवस्था वाईटच होती. त्यातच त्याची खास मैत्रीण आणि कथित प्रेयसी शहनाज गिल हिच्याकडे पाहून दगडालाही पाझर फुटेल अशीच तिची अवस्था झाली होती. 

डोळ्यातील अश्रू थांबण्याचं नाव घेत नव्हते आणि मन थाऱ्यावर येत नव्हतं अशीच काहीशी शहनाजची अवस्था यावेळी सर्वांनी पाहिली. सिद्धार्थवर अंत्यविधी झाले आणि त्याचक्षणी शहनाज जमिनीवर कोसळली. आयुष्याचा एक भागच हिरावून घेतल्याच्या भावनेनं निराधार झाल्याप्रमाणे ती कोलमडली. 

शहनाजला पाहून तिथं असणाऱ्या प्रत्येकाच्या मनात कालवाकालव झाली. तिथे सिद्धार्थच्या आईची समजूत काढण्याचंही कोणचं धाडस झालं नाही. काळाचा घालाच इतका मोठा होता की काय करावं कोणालाच सुचेना. सिद्धार्थचा मित्र, अभिनेता असिम रियाज यावेळी एकटाच स्मशानाच्या पायरीवर बसून आसवं गाळताना दिसला. जीवनाच्या या टप्प्यावर सिद्धार्थनं घेतलेली एक्झिट सर्वांच्याच काळजाचं पाणी करुन गेली. सर्व स्तरांतून त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली. झी 24 तास कडूनही सिद्धार्थ शुक्ला याला भावपूर्ण श्रद्धांजली.