धक्कादायक : सिनेमाआधीच सलमान खानला शहनाजने केलं ब्लॉक

सलमान खान (Salman Khan) आणि शहनाज (Shehnaaz Gill) एकमेकांसाठी खूप खास आहेत. हे सगळ्यांनाच माहितीये. लवकरच या दोघांचा एकत्र 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. शहनाज या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.

Updated: Apr 14, 2023, 07:00 PM IST
धक्कादायक : सिनेमाआधीच सलमान खानला शहनाजने केलं ब्लॉक title=

Salman Number Blocked By Shehnaaz Gill : सलमान खान (Salman Khan) आणि शहनाज (Shehnaaz Gill) एकमेकांसाठी खूप खास आहेत. हे सगळ्यांनाच माहितीये. लवकरच या दोघांचा एकत्र 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. शहनाज या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये संपुर्ण टीम सध्या व्यस्त आहे. नुकतीच या सिनेमाची टीम कपिल शर्मा या शोमध्ये पोहचली होती. या दरम्यान शहनाजने एक खूप मोठा खुलासा केला की, तिने एकदा सलमान खानचा फोन नंबर ब्लॉक केला होता. हे ऐकून सगळेच हैराण झाले. खरंतर ही गोष्ट या सिनेमा अगोदरची आहे. 

जेव्हा सलमानने शहनाजला 'किसी का भाई किसी की जान' रोल ऑफर करण्यासाठी फोन केला तेव्हा, तिने तो फोन नंबर अनोळखी आहे म्हणून ब्लॉक केला. त्यावेळी ती अमृतसरमध्ये होती. ज्यावेळी सलमानने तिला कॉल केला तेव्हा तो नंबर अनोळखी (Unknown Number) होता. त्यामुळे तिने तो फोन नं उचलता  तिने तो नंबर ब्लॉक केला.

पुढे शहनाज म्हणाली, तिला अनोळखी नंबर ब्लॉक करायची सवय आहे. तिला माहितीच नव्हतं की, तो फोन सलमान खानचा आहे. म्हणून तिने तो नंबर ब्लॉक केला. त्यानंतर काही वेळानंतर तिला एक मॅसेज मिळाला की, सलमानने तिला फोन केला होता. यानंतर तिने तो नंबर क्रॉसचेक करण्यासाठी ट्रूकॉलरवर चेक केला. तेव्हा तिला खात्री पटली की, तिला सलमान खानने फोन केला होता. यानंतर तिने सलमानचा नंबर अनब्लॉक केला आणि त्याला फोन केला. सलमानने तिला या रोलसाठी ऑफर केलं. आणि अशाप्रकारे तिला या सिनेमासाठी सिलेक्ट करण्यात आलं.

 किसी का भाई किसी की जान या सिनेमात आहे ही स्टार कास्ट
फरहाद सामजी दिग्दर्शित 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात पूजा हेगडे, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, राघव जुयाल, जस्सी गिल आणि जगपती बाबू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 21 एप्रिलला ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.