मुंबई : अभिनेत्री शेफाली शाह हिनं नुकतंच केलेल्या एका वक्तव्यानं सर्वांच्या नजरा वळवल्या. शेफाली कायमच चौकटीबाहेरच्या भूमिकांना न्याय देण्यासाठी ओळखली जाते. अशातच ती आणखी एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आली. जिथं तिनं पहिल्यांदाच ऑनस्क्रीन इंटिमेट सीन दिला.
Disney+Hotstar वर Human या सीरिजमध्ये शेफाली आणि किर्ती कुल्हारी यांच्यातील किसिंग सीन दाखवण्यात आला आहे. मुलाखतीमध्ये खुद्द किर्तीनं एका महिलेला किस करण्याबाबच्या अनुभवाचं कथन केलं.
शेफालीलाही यासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनीही यावर वक्तव्य केलं. 'मी जेव्हा हा सीन वाचला तेव्हा स्क्रीप्टसाठी ही गरज असल्याचं लक्षात आलं.
तुम्ही किर्ती काय म्हणाली ते ऐकलंच असेल. कारण, मी माझी व्हर्जिनिटीच किर्तीसोबत गमावली. कारण, याआधी मी ऑनस्क्रीन कधीच किस केलं नव्हतं.
मला त्यात काही कठीण वाटलं नाही, कारण तिथं एक महिलाच होती. कारण, तोपर्यंत सीरिजमध्ये गौरी आणि सायरा प्रेमात असतात आणि ती एक भावना आहे.
त्या क्षणाला त्या दोघींच्याही भावनांचं प्रदर्शन होतं. त्यामुळं कोणतीही संकोचाची भावना माझ्या मनात आलीच नव्हती', असं ती म्हणाली.
अभिनेत्रीनंच अभिनेत्रीशी प्रेमसंबंध जपणं, किंला समलैंगिंक संबंधांना एखाद्या कलाकृतीतून दुजोरा देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही बऱ्याच कलाकृतींच्या माध्यामातून प्रेमाचा हा वेगळा दृष्टीकोन अधिक समर्पकपणे दाखवण्यात आला आहे.