पत्नीचा वाढदिवस विसरल्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांच काय होतं?

फिल्म इंडस्ट्री ते राजकारणाच्या कॉरिडॉरपर्यंत शत्रुघ्न सिन्हा यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

Updated: May 9, 2021, 04:54 PM IST
पत्नीचा वाढदिवस विसरल्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांच काय होतं? title=

मुंबई : बॉलिवूडचे शॉटगन शत्रुघ्न सिन्हा हे आपल्या हजरजबाबीपणामुळे कायम चर्चेत असतात. फिल्म इंडस्ट्री ते राजकारणाच्या कॉरिडॉरपर्यंत शत्रुघ्न सिन्हा यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांची अष्टपैलू स्टाईल त्यांच्या चाहत्यांनी चांगलीच पसंत केली आहे. मात्र जेव्हा शत्रुघ्न सिन्हा पत्नी पूनम सिन्हाचा वाढदिवस विसरतात. यानंतर काय झालं? हे जाणून घेतल्यावर आपण देखील आपलं हसू रोखू शकणार नाही.

शत्रुघ्न सिंन्हा टेलिव्हिजनच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' मध्ये आले होते. जेव्हा जेव्हा एखादा पाहुणा या शोमध्ये येतो तेव्हा शोचा होस्ट कपिल शर्मा आलेल्या प्रत्येकाला अंतरंगी प्रश्न विचारतो. यावेळी देखील कपिल शर्माने असंच काहीसं केलं.

शोमध्ये कपिल शर्माने शत्रुघ्न सिन्हा यांना विचारलं की, जर तुम्ही तुमच्या पत्नीचा वाढदिवस विसरलात तर काय होत? क्षणभर विचार केल्यावर शत्रुघ्न कपिलकडे  बघत इशारा करत म्हणतात की, "काय-काय होऊ शकतं ... तुला माझ्या चेहऱ्यावरचे एक किंवा दोन खुणा एक्स्ट्रा दिसतच असतील ना?  तू समजू शकतोस मला काय म्हणायचं आहे" शत्रुघ्न सिन्हा यांचं हे उत्तर ऐकून सर्वजण हसले.

याशिवाय कपिल शर्माने शत्रुघ्न सिन्हा यांना आणखी एक प्रश्न विचारला, 'सर, कधी  असं घडलं आहे का? तुम्ही एखादा रोमँटिक सीन शूट करत आहात आणि तुमच्या असिस्टंटने येवून तुम्हाला असं सांगितलं की, सर पूनम मॅम लंच घेऊन आल्या आहेत? तेव्हा तुम्ही काय केलं? ' या प्रश्नाला उत्तर देताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, एकदा पूनम जी यांनी एका फ्लॅट बद्दल विचारलं.

मला  विचारंलं की, 'मी ईथे यायचे आणि मुलांना घेवून जायचे तर मला तिथली लोकं विचारायची की इकडे शत्रुघ्न येवुन जातात. मला एक गोष्ट सांगा की, मी जेव्हा या फ्लॅटच्या समोरुन जाते तेव्हा मला कधीच लाईट जळताना दिसत नाही कायमच अंधार दिसतो. असं का? काळोख का असतो तिथे? पूनमच्या प्रश्नाला उत्तर देताना शत्रुघ्न म्हणाले, "मी तिथे थोडी ना कुठलं पुस्तक वाचायला जातो."

शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, ते कायमच धर्मेंद्र यांचे चाहते आहेत. धर्मेंद्र हा त्यांचा आवडता नायक आहे. एक किस्सा सांगताना ते म्हणाले,  'एकदा धर्मेंद्र एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी आले होते आणि त्यावेळी मला त्यांच्यासोबत कसं बोलायचं ते माहित नव्हतं. म्हणून मी दोन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना विचारलं आपण आपल्या केसांना कोणते तेल लावले आहे.