शर्वरी वाघचा बोल्ड फोटोशूट, Photo पाहून चाहते थक्क

जाऊबाई जोरात! कॅटरीना कैफच्या जाऊबाईने दिले बोल्ड पोज, Photo पाहिलेत का तुम्ही? 

Updated: Oct 10, 2022, 04:49 PM IST
शर्वरी वाघचा बोल्ड फोटोशूट, Photo पाहून चाहते थक्क title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ (Sharvari Wagh)  सोशल मीडियावर खुप अॅक्टीव्ह असते.सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता असाच तिने एक फोटोशूट केला आहे. या फोटोशुटचे फोटो आता समोर आले आहे. हे फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत. 

शर्वरी वाघने (Sharvari Wagh Photo) नुकतीच बॉलिवूडमध्ये (Bollywood) एन्ट्री केली आहे. मात्र बॉलिवूडमध्ये अभिनयापेक्षा तिच्या अफेअरची चर्चा आहे. शर्वरी वाघचं (Sharvari Wagh)  नाव विकी कौशलचा (vicky Kaushal) भाऊ सनी कौशल सोबत जोडलं जात आहे. दोघे विकी कौशलच्या लग्नात देखील एकत्र दिसले होते. त्यामुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चांना वेग आला आहे. दरम्यान जशी कॅटरीना कैफ ग्लँमरस आहे तितकीच तिची जाऊबाई देखील आहे. 

फोटोत काय? 
शर्वरी वाघने (Sharvari Wagh) सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत ती खुपच ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. चाहत्यांना तिचे हे फोटो खुप आवडले आहेत. 

लुकची चर्चा 
शर्वरी वाघच्या (Sharvari Wagh Photo) या फोटोतील लुकची खुप चर्चा आहे. या फोटोत डीप नेक ब्लाउजमध्ये शर्वरी वाघ अतिशय हॉट आणि सिझलिंग पोज देताना दिसत आहे. फोटोत तिने हिरव्या रंगाचा सुंदर आणि स्टायलिश लेहेंगा व त्याच रंगाचा हिरव जॅकेट परिधान केलं आहे. या जॅकेटच्या आत तिने डीप नेक ब्लाउज घातला आहे. यासोबत गळ्यात डायमंडचा नेकलेस आणि कानात डायमंड कानातल्या घातल्या आहेत.तसेच तिने केस बांधली आहे. अशातह्रने तिने आपला लुक पुर्ण केला आहे. 


 
शर्वरी वाघने (Sharvari Wagh) तिच्या फोटोंनी इंस्टाग्रामवर खळबळ उडवून दिली आहे. या लेटेस्ट फोटोंमध्ये शर्वरी वाघ खूपच सुंदर दिसत आहे. शर्वरी वाघचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे आणि ते तिच्या लूकचे कौतुक करताना थकत नाहीत. 

दरम्यान शर्वरी वाघने (Sharvari Wagh Photo) आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 'बंटी और बबली 2' मधून केली होती. आता ती इतर आणखी प्रोजेक्टसवर काम करतेय.