दीपिकाला धक्का; सामंथा आणि रणबीर सिंगमध्ये जवळीक?

समंथा रुथ प्रभूने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर रणवीरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. 

Updated: Jun 6, 2022, 06:25 PM IST
दीपिकाला धक्का; सामंथा आणि रणबीर सिंगमध्ये जवळीक?  title=

मुंबई : साऊथ सेन्सेशन समंथा रुथ प्रभू आणि बॉलिवूडचा हँडसम हंक रणवीर सिंग लवकरच एका प्रोजेक्टसाठी एकत्र येणार असल्याचं दिसतंय. नुकतच, समंथा रुथ प्रभूने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर रणवीरसोबतचा एक फोटो शेअर केला होता. फोटोत, सामंथा वायुसेना अधिकाऱ्याच्या गणवेशात गॉगल घातलेल्या रणवीर सिंगसोबत कॅमेरासाठी पोज देताना दिसत आहे.

तिने त्याच्या पोस्टला कॅप्शन देत लिहीलं की, सर्वात गोड Sharing a photo with Ranveer Singh, Samantha said something like this, Deepika will also get angry
@ranveersingh.' त्याचबरोबर, रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरील पोस्टवर प्रतिक्रिया देत लिहीलं की, 'Twas a delight @samantharuthprabhu'. याशिवाय अभिनेत्याने हार्ट आणि हग इमोजी देखील शेअर केले आहेत.

रणवीरने यापूर्वीही केलं आहे समंथाचं कौतुक 
याआधी, रणवीर सिंगने खुलासा केला होता की, पुष्पा चित्रपटातील समंथाचा हिट डान्स ओ अंतवा हे त्याचं आवडतं गाणं आहे. जयेशभाई जोरदार या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "मला वाटतं, अलीकडच्या काळातलं माझं आवडतं गाणं ओअंतवा आहे. जेव्हा हे गाणं वाजतं तेव्हा मला वेड लागतं. हे गाणं काय आहे ते मला समजत नाही. पण त्याच्या संगीतात काहीतरी जादू आहे, जी मला भावते.

समंथा या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे
 सामंथा नुकतीच विजय सेतुपतीसोबत काथू वकुला रेंडू कादल या तामिळ चित्रपटात दिसली होती. याशिवाय, ती नुकतीच काश्मीरहून परतली आहे. जिथे अभिनेत्री विजय देवरकोंडासोबत तिच्या आगामी 'खुशी' चित्रपटाचं शूटिंग करत होती. त्याचबरोबर या वर्षी समंथा शकुंतलम आणि यशोदा या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

याशिवाय रणवीर सिंगबद्दल बोलायचं झालं तर त्याचा जयेशभाई हा चित्रपट गेल्या महिन्यातच जोमाने प्रदर्शित झाला आहे. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. याशिवाय तो लवकरच करण जोहरच्या रॉकी और रानी की कहानी या चित्रपटात आलिया भट्टसोबत दिसणार आहे. सध्या रणवीर सिंग रोहित शेट्टीचा आगामी सिनेमा सर्कसच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.