'डेंजर हुं मैं, क्या समझा हैं तुने?' शरद केळकरच्या ‘रानटी’ चिपटाचा टीझर प्रदर्शित!

Sharad Kelkar Raanti Movie Teaser : शरद केळकरच्या 'रानटी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित..

दिक्षा पाटील | Updated: Oct 26, 2024, 01:59 PM IST
'डेंजर हुं मैं, क्या समझा हैं तुने?' शरद केळकरच्या ‘रानटी’ चिपटाचा टीझर प्रदर्शित! title=
(Photo Credit : Social Media)

Sharad Kelkar Raanti Movie Teaser : लोकप्रिय अभिनेता शरद केळकरचा बहुचर्चित रानटी या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अॅक्शनपटाच्या टीझरनं सगळ्यांचे लक्ष वेधले. आलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्याची जिद्द असलेल्या विष्णूचा रौद्र अवतार दाखविणाऱ्या ‘रानटी’ चित्रपटाच्या टिझरमधून अॅक्शन, ड्रामा आणि इमोशन्स यांची जबरदस्त गुंफण पाहायला मिळते आहे. शरद केळकरनं शेअर केलेल्या या टीझरनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. सगळीकडे या टीझरचीच चर्चा सुरु आहे. 

शरद केळकरनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा टीझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये शरद केळकरचा कधी न पाहिलेला असा 'रानटी' अंदाज पाहायला मिळत आहे. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला सगळ्यात मोठा अ‍ॅक्शनपट असणार आहे. आपल्या खलनायकी अवताराने सर्वांचा थरकाप उडवणारे बॉलिवूडचे सुप्रसिद्ध ‘रानटी’ खलनायक जॅकी श्रॉफ आणि संजय दत्त यांनी सुद्धा दिग्दर्शिक समित कक्कड च्या ‘रानटी' चित्रपटाच्या दमदार टिझरची झलक सोशल मीडियामध्ये शेअर केली आहे. हा टिझर शेअर करत शरद केळकरनं कॅप्शन दिलं की 'लाल लाल रक्त आणि लाख लाख गुन्हे... डेंजर हुं मैं, क्या समझा हैं तुने!?' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

लेखनापासून ते अभिनयापर्यंत आणि निर्मितीमूल्यांपासून सादरीकरणापर्यंत सर्वच पातळीवर दिग्दर्शक समित कक्कड यांचे सर्व चित्रपट लक्षवेधी राहिले आहेत. ‘रानटी’ च्या निमित्ताने मराठीत भव्य अॅक्शनपट घेऊन आले आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासून त्यातील वेगळेपणा आणि भव्यता दिसून अली आहे. ‘रानटी’चा टिझर पाहताना सर्वांच्याच अंगावर अक्षरशःकाटे येतात. हा टिझर पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

हेही वाचा : VIDEO : स्टेजवर परफॉर्म करत असताना धाडकन पडली विद्या बालन, त्यानंतर जे झालं...

‘रानटी’ चित्रपटासाठी हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम चित्रपटाला लाभलेली आहे. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला मोठा अ‍ॅक्शनपट 22 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.