मुंबई : आपल्या जबरदस्त चित्रपट आणि डायलॉमुळे अमिताभ बच्चन यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण करण्याबरोबरच लोकांच्या हृदयात स्थान मिळवलं आहे. फारच थोड्या लोकांना हे माहित असेल की, अमिताभ बच्चन यांना आपल्या आयुष्यात अभिनेता बनायचं नव्हतं तर इंजीनिअर व्हायचं होतं. अमिताभ आज बॉलिवूडमधील यशस्वी आणि दिग्गज कलाकारांमध्ये येतात. त्यांच्या जन्मानंतर कोणीच असा विचारही केला नव्हता, अमिताभ यांचं नाव एवढं मोठं होईल. पण या यशामागे बराच संघर्ष दडलेला आहे.
अमिताभ यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यापूर्वी बराच संघर्ष केला. चित्रपटांमधील सुरुवातीच्या दिवसातही त्यांनी खूप स्ट्रगल केलं आहे. पण असं म्हणतात की, काळ नक्कीच बदलतो. अमिताभ यांच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं. जंजिर चित्रपटात काम केल्यानंतर अमिताभ यांचं नशिब पलटलं. त्यांचे फॅनही वाढले.
त्यांच्या आयुष्यात बरेच किस्से घडले जे त्यांना विसरणं कठीण आहे. 'भाई, मूंछे हों तो नत्थू लाल जैसी' हा डायलॉग एकेकाळी खूप गाजला होता. मात्र हा तोच चित्रपट आहे ज्यासाठी एक सीन करण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी 45 रीटेक दिले होते.
अमिताभ बच्चन ऑनस्क्रीन वडील म्हणजेच प्राण यांच्यासोबत आपल्या पार्टीत आलेल्या पाहुण्यांना भेटतात. या सीनमध्ये त्यांना एका माणसाला भेटायचं असतं, ज्याचं नाव दारूवाला आहे. अमिताभ त्यांना मिठी मारतात आणि खूप आनंदी होतात. हा सीन करण्यासाठी अमिताभ यांनी एकूण दोन तास घेतले.
एका वृत्तानुसार, जेव्हा हा सीन शूट केला जात होता तेव्हा अमिताभ बच्चन आणि त्यांच्या समोर उभा असलेला पाहुणा म्हणजेच दारूवाला यांच्या आवाजात पुन्हा पुन्हा अंतर येत होतं. पाहूण्याचं कॅरेक्टर सादर करण्याऱ्या व्यक्तीचा आवाज एवढा कमी येत होता.
ज्यासाठी माइकचा आवाजही वाढवण्यात आला होता, मात्र अमिताभ यांना त्यांना खूप उत्साहाने भेटायचं होतं, यामुळे त्यांचा आवाज माइकवर फाटायचा. हेच कारण आहे की, हा सीन शूट करायला जवळजवळ दोन तास लागले.
शराबी हा चित्रपट अमिताभ यांच्या कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात जया प्रदा यांनी अमिताभबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. या चित्रपटाची गाणीही खूप गाजली. 'दे दे प्यार दे' हे गाणे आजही लोकांच्या हृद्यात आहे. किशोर कुमार यांनी हे गाणं गायलं होते या गाण्याला संगीत बाप्पी लाहिरी यांनी दिलं होतं.