मेड इन चायना लगती है; रॅम्पवॉकमुळे Shanaya Kapoor झाली ट्रोल

Shanaya Kapoor चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. इतकंच नाही तर तिला अनेकांनी सोशल मीडियावर ट्रोल आहे. तर काही नेटकऱ्यांनी शनायाची स्तुती केली आहे. शनायानं लॅक्मे फॅशन विकमध्ये हा रॅम्पवॉक केला होता. 

Updated: Mar 12, 2023, 04:07 PM IST
मेड इन चायना लगती है; रॅम्पवॉकमुळे Shanaya Kapoor झाली ट्रोल title=

Shanaya Kapoor Rampwalk Troll : बॉलिवूड अभिनेता संजय कपूर (Sanjay Kapoor) यांची लाडकी लेक शनाया कपूर (Shanaya Kapoor) ही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शनाया ही लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. शनाया नुकतीच लॅक्मे फॅशन वीकमध्ये दिसली होती. तिनं रॅम्प वॉक केला आहे. शनायाचा रॅम्प वॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. कोणी तिला प्लास्टिकची बाहुली म्हटलं आहे तर कोणी सोनम कपूरपेक्षा चांगली आहे असं म्हटलं आहे. (Shanaya Kapoor Rampwalk)

शनायानं तिचा हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी शनायानं पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. तर त्यासोबत तिनं ट्यूब ब्लाऊज परिधान केलं आहे. शनायानं डिझायनर अर्पिता मेहतासाठी हे रॅम्पवॉक केलं होतं. शनाया अर्पिताची शो स्टॉपर होती. हा व्हिडीओ शेअर करत तिनं अर्पि म्हणजेच अर्पिता असे कॅप्शन दिले आहे. तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : म्युझिक फेस्टिव्हलमध्ये लाइव्ह परफॉर्म करताना 'या' गायकानं स्टेजवरच घेतला अखेरचा श्वास

शनायाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, तिला नीट चालता ही येत नव्हतं. तुम्हाला हे दिसलं नसेल कारण तिनं हे एडिट केलं आहे. तू पुढच्या वेळी चांगलं करशील अशी अपेक्षा आहे. दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, तुला मॉडेलसारखे वॉक करता आले नाही. तिसरा नेटकरी म्हणाला, अशा अनेक मॉडेल आहेत ज्या उत्तम वॉक करतात पण त्यांना कधी संधी मिळत नाही. तिसरा नेटकरी म्हणाला, ती मध्ये अडकली होती. तिनं ते एडिट केलयं. आणखी एक नेटकरी म्हणाला, पुरा प्लास्टिक मेड इन चायना लगती है. तर पुढे काही नेटकऱ्यांनी कमेंट करत तिची स्तुती केली आहे. एक नेटकरी म्हणाला, शनाया तू खूप सुंदर दिसतेस. दुसरा म्हणाला, तुला पाहून मिस युनिव्हर्सचा फील येतोय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शनाया ही 23 वर्षांची आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर शनायानं वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. नेहमी प्रमाणे करण जोहरवर स्टार किड्सला लॉन्च करतो. तर शनाया बेधड या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.