शमिता शेट्टी डिप्रेशनची शिकार म्हणाली, 'एक्स बॉयफ्रेंडमुळे'...

 शमिता बहीण शिल्पा शेट्टीच्या एका चॅट शोमध्ये पोहोचली होती

Updated: Apr 24, 2022, 06:36 PM IST
शमिता शेट्टी डिप्रेशनची शिकार म्हणाली, 'एक्स बॉयफ्रेंडमुळे'... title=

मुंबई : अभिनेत्री शमिता शेट्टीने अलीकडेच एका चॅट शोमध्ये खुलासा केला की, ती डिप्रेशनची शिकार झाली आहे. यासोबतच तिने त्यावर कशी मात केली हेही सांगितलं. अलीकडेच शमिता बहीण शिल्पा शेट्टीच्या एका चॅट शोमध्ये पोहोचली होती. यादरम्यान तिच्यासोबतची ही मुलाखत सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये  तिने तिच्या डिप्रेशनबद्दल आणि त्यावर मात करण्याबद्दल सांगितलं. शोमध्ये शिल्पाने बहीण शमिताला त्यावेळी मानसिक आरोग्याशी लढा देऊनही बिग बॉस शोमध्ये जाण्याच्या तिच्या निर्णयाबद्दल विचारलं.

याला उत्तर देत शमिता म्हणाली, "खर सांगू, जेव्हा मी बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी काय विचार करत होते हे मला माहित नव्हतं. तुम्ही पाहिलंच असेल की, माझ्या घरात अनेक चढ-उतार आले. मी कसं हँण्डल केलं ते माझं मला माहित आहे

मी डिप्रेशनमधून गेले आहे आणि त्यामुळे मला अधिक बळ मिळालं आहे. यामुळे मला अनेक आव्हानांना सामोरं जाण्याचं धैर्य मिळालं. मला असं वाटतं की, मी त्यावर मात केली तर मी काहीही करू शकते."

''तुम्ही हे सांगण्यासाठी खूप धाडसी आहात, आपल्या देशातील अनेकांना वाटतं पण ते बोलत नाहीत कारण त्यांचा असा विश्वास आहे की, नैराश्य आणि मानसिक आरोग्याशी एक कलंक जोडलेला आहे. शमिता पुढे म्हणाली, ''वैयक्तिकरित्या जेव्हा मी त्या टप्प्यातून गेले, तेव्हा मी डिप्रेशन मध्ये आहे हे देखील माहित नव्हतं. मी का वागले किंवा विशिष्ट मार्ग का वाटला हे मला समजलं नाही. मला सतत हरवल्यासारखं वाटत होतं."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शमिताला तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिला डिप्रेशनमध्ये आहे हे समजण्यासाठी कशी मदत केली हे आठवलं. ती म्हणाली, "मी त्यावेळी कोणालातरी डेट करत होते आणि त्याने मला सांगितलं की 'काहीतरी गडबड आहे. लोकांना हे सत्य स्वीकारावं लागेल. अशा वेळी कुटुंबांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो.'  मी म्हणेन, ज्या लोकांना कुटूंबाचा पाठिंबा नाही त्यांनी कृपया स्वतःसाठी काहीतरी करायला हवं. तुमच्या डिप्रेशनमध्ये मदतीसाठी विचारा.''