Drugs प्रकरणात मुलाला अटक झाल्यानंतर शक्ती कपूरची पहिली प्रतिक्रिया

मुलाला ड्रग्स प्रकरणी अटक झाल्यानंतर काय म्हणला शक्ती कपूर?  

Updated: Jun 13, 2022, 12:05 PM IST
Drugs प्रकरणात मुलाला अटक झाल्यानंतर शक्ती कपूरची पहिली प्रतिक्रिया title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता शक्ती कपूरचा (Shakti Kapoor) मुलगा सिद्धांत कपूर सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ड्रग्ज घेतल्याप्रकरणी सिद्धांतला ताब्यात घेतल आहे. बंगळुरु पोलिसांनी रविवारी रात्री एका पंचतारांकित हॉटेलवर छापा टाकला होता तेथून सिद्धांतला ताब्यात घेण्यात  घेतल आहे. ड्रग्ज टेस्टमध्ये श्रद्धा कपूरच्या भावासह एकूण सहा जणांनी ड्रग्स घेतल्याचं समोर आलं आहे. 

ड्रग्ज प्रकरणात सिद्धांतचे नाव आल्यावर शक्ती कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ईटाइम्ससोबत बोलताना शक्ती कपूर म्हणाला, 'मी फक्त एकच सांगू शकतो, ते शक्य नाही.' 

सिद्धांत कपूर बद्दल सांगायचं झालं तर, त्याने 'भौकाल' सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. याशिवाय 'चेहरे', 'हसिना पारकर', 'शूटआऊट ऍट वडाळा' आणि 'जज्बा' यांसारख्या चित्रपटांमध्ये सिद्धांतने काम केलं आहे, मात्र तो इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवू शकला नाही.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज प्रकरणी श्रद्धा कपूरचीही चौकशी करण्यात आली होती. श्रध्दाने चौकशीदरम्यान सांगितले होते की, सुशांतच्या पवना गेस्टहाऊसवर झालेल्या छिछोरे चित्रपटाच्या सक्सेस पार्टीला तिने हजेरी लावली होती. पण ड्रग्स घेतल नसल्याचं अभिनेत्रीने सांगितलं.