aryan khan ला अटक, शाहरुख खान अद्याप का शांत?

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली आहे. 

Updated: Oct 4, 2021, 10:20 AM IST
 aryan khan ला अटक, शाहरुख खान अद्याप का शांत? title=

मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली आहे. आर्यन खान एक दिवस एनसीबीच्या ताब्यात असेल. क्रूज ड्रग पार्टी प्रकरणात आर्यनची खूप वेळ तपासणी करण्यात आली. त्यानंतर 2 इतर साथीदारांसह त्याला अटक करण्यात आलं. 

आर्यनला अटक करण्यात आल्यानंतर शाहरुखच्या मन्नत बंगल्याबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. आर्यनला ताब्यात घेतल्यानंतर रात्री उशिरा सलमान खान शाहरुखच्या भेटीसाठी पोहोचला होता. यावेळी त्याने शाहरुखसोबत बातचीत केली. 

पण शाहरुखने अबोला कायम ठेवल्याचं दिसतयं. त्याने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. शाहरुख या प्रकरणावर काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. शाहरुख खान, गौरी खान आणि सुहाना खान यांनी कोणत्याही प्रकारची भूमिका अद्याप मांडलेली नाही. अनेक बॉलिवूडमधील कलाकार सध्या शाहरुखला साथ देत आहेत. या काळात त्याला पाठिंबा देण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान आर्यन खानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत एनसीबी आणि पोलीसांची टीम दिसत आहे. यानंतर आर्यन खानच्या आऊटफिटने सगळ्यांचं लक्ष केंद्रीत केलं. यानंतर त्याचा वेगळा लूक देखील समोर आलं आहे.